Hockey WC Final GER vs BEL: हॉकी विश्वचषक २०२३ (Hockey WC 2023) मध्ये आज (२९ जानेवारी) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जर्मनी आणि बेल्जियम (GER vs BEL) यांच्यात होईल. बेल्जियम हा गतविजेता आहे, त्याला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, १७ वर्षांनंतर जर्मनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी उतरणार आहे.
जर्मनी आतापर्यंत दोनदा (२००२, २००६) विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. त्याचबरोबर हे जेतेपद एकदाच बेल्जियमकडे आले आहे. सध्या दोन्ही संघ हॉकी क्रमवारीत टॉप-४ मध्ये आहेत. अशा स्थितीत आजचा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. या विश्वचषकात दोन्ही संघ एकाच पूलमध्ये होते. येथे त्यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता.
या विश्वचषकातील जर्मनीचा प्रवास –
जर्मनीचा संघ हॉकी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने नंबर-१ रँकिंगच्या ऑस्ट्रेलियाचा ४-३ असा पराभव केला. या विश्वचषकात जर्मनीचा आतापर्यंतचा प्रवास नेत्रदीपक राहिला आहे. पूल स्टेजमध्येही जर्मन संघाने दक्षिण कोरिया आणि जपानचा पराभव केला, तर बेल्जियमसोबतचा सामना अनिर्णित राहिला. ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रॉसओव्हर सामना खेळावा लागला. क्रॉसओव्हर सामन्यात, जर्मनीने फ्रान्सचा ५-१ ने पराभव केला. तसेच उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा ४-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या विश्वचषकातील बेल्जियमचा प्रवास –
हॉकी रँकिंगमध्ये नंबर-२, बेल्जियमने त्यांच्या पूल-बीमध्ये दक्षिण कोरिया आणि जपानला पराभूत केले होते. त्याचवेळी जर्मनीसोबतचा त्यांचा सामना अनिर्णित राहिला. गोल फरकात जर्मनीच्या पुढे असल्याने बेल्जियमने पूलमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच बेल्जियमने न्यूझीलंडचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
बेल्जियम संघ: गोलकीपर: लुई व्हॅन डोरेन, व्हिन्सेंट व्हॅन्स, बचावपटू: आर्थर व्हॅन डोरेन, गौथियर बोकार्ड, अलेक्झांडर हेंड्रिक्स, आर्थर डी स्लोव्हर, लॉइक लुपर्ट, मिडफिल्डर: जॉन-जॉन डोहमेन, फेलिक्स डेनेयर, सायमन गौगनर्ड, व्हॅक्टर, व्हिक्टर स्ट्रायकर्स: फ्लोरेंट व्हॅन ओबेल, सेबॅस्टिन डॉकियर, सेड्रिक चार्लियर, निको डीकेरपेल, टॉम बीन, टँग्यु कोसिन्स
जर्मनी संघ: गोलरक्षक: स्टॅडलर अलेक्झांडर, जीन डेन्बर्ग, बचावपटू: मॅथियास मुलर, लुकास विंडफेडर, टॉम ग्रॅम्बुश, टेओ हेनरिक, गोन्झालो पिलाट, मॉरिट्झ लुडविग, मिडफिल्डर: मॅट्स ग्रॅम्बुश, मार्टिन झ्विकर, हॅनेस म्युलर, टेमुर ट्रॉम्प, मॉरिट्झ, मॉरिट्झ, मॉरीट्झ, मिडफिल्डर निकलस वेलेन, क्रिस्टोफर रुहर, जस्टस वेईगंड, मार्को मिल्काऊ, थीस प्रिंझ
हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: लखनऊमध्ये टॉस ठरणार बॉस? प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचे राहिले आहे वर्चस्व
१९२८ ऑलिम्पिकपासून आतापर्यंत ३५ सामन्यांत जर्मनीने १५ तर बेल्जियमने १३ सामने जिंकले आहेत. सात सामने अनिर्णित राहिले आहेत. पण गेल्या पाच सामन्यांचे निकाल पाहता गेल्या पाच सामन्यांमध्ये बेल्जियमने ३ जिंकले आहेत आणि १ गमावला आहे.१ अनिर्णित राहिला आहे. मात्र विजयाचे अंतर फारसे राहिले नाही.
हेड टू हेड रेकॉर्ड –
सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
हॉकी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर होणार आहे. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.