कॅनडावर ५-०ने दणदणीत विजय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भुवनेश्वर : तीन वेळा विजेत्या नेदरलँड्सने मंगळवारी बाद फेरीत दुबळ्या कॅनडाचा ५-० असा धुव्वा उडवीत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. आता गुरुवारी यजमान भारत आणि नेदरलँड्स यांच्यात विश्वचषक हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व लढत रंगणार आहे.

सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजविणाऱ्या नेदरलँड्सने तब्बल पाच मैदानी गोलांची नोंद करीत कॅनडाला पूर्णपणे निष्प्रभ केले. लार्स बाल्क (१६व्या मिनिटाला), रॉबर्ट केम्पेरमन (२०व्या मिनिटाला), थिज्स व्ॉन डॅम (४०व्या आणि ५८व्या मिनिटाला) आणि थिएरी ब्रिंकमन (४१व्या मिनिटाला) यांनी गोल करीत नेदरलँड्सला सहज विजय मिळवून दिला.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्स आणि ११व्या क्रमांकावरील कॅनडा यांच्यातील हा सामना अतिशय एकतर्फी झाला. नेदरलँड्सने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण अवलंबीत जोरदार हल्ले चढवले. कॅनडाने प्रतिहल्ले करण्यापेक्षा बचावावर अधिक भर दिला. कॅनडाने १५ मिनिटे प्रतिकार केल्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रात दोन, तिसऱ्या सत्रात दोन आणि चौथ्या सत्रात एक गोल करत नेदरलँड्सने आरामात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात

भुवनेश्वर :  ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने बाद फेरीत पाकिस्तानचा ५-० असा धुव्वा उडवल्यामुळे विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान  उपांत्यपूर्व फेरीआधीच संपुष्टात आले.

अलेक्झांडर हेंड्रिक्सने १०व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे खाते उघडल्यानंतर बेल्जियमने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर कर्णधार थॉमस ब्रिएल्स (१३व्या मिनिटाला), सेड्रिक चार्लियर (२७व्या मिनिटाला), सेबॅस्टियन डॉकियर (३५व्या मिनिटाला) आणि टॉम बून (५३व्या मिनिटाला) यांनी गोल करत बेल्जियमला दणदणीत विजय मिळवून दिला. आता उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमची गाठ गुरुवारी जर्मनीशी पडेल.

आजचे सामने

’अर्जेटिना वि. इंग्लंड

वेळ : सायं. ४.४५

’ऑस्ट्रेलिया वि. फ्रान्स

वेळ : सायं. ७ वाजता

’थेट प्रक्षेपण:

स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १