पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक लीग हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीसाठी सज्ज होण्याकरिता नेदरलॅण्ड्स दौऱ्यात भारतीय संघाला आपल्या चुका शोधता येतील, तसेच त्यात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने व्यक्त केले.
‘‘हा दौरा आमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतीय संघाचे उच्च कामगिरी संचालक रोएलन्ट ओल्टमान्स यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला बलाढय़ क्लब्सविरुद्ध खेळता येणार आहे. या दौऱ्यातून आम्हाला भरपूर काही शिकता येणार आहे. आमच्या चुका शोधून त्यावर मात कशी करायची, याबाबत रणनीती आखता येईल,’’ असे सरदार सिंगने सांगितले.
नेदरलॅण्ड्वर ०-२ अशी मात करणाऱ्या भारतीय संघाने रॉटरडॅम संघावरही विजय मिळवला. १३ ते २३ जूनदरम्यान रॉटरडॅम येथे होणाऱ्या जागतिक लीग (तिसरी फेरी) स्पर्धेसाठी भारताची कसून तयारी झाली आहे. या स्पर्धेत भारतासह नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रेलिया, स्पेन, न्यूझीलंड आणि आर्यलड हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेविषयी सरदार म्हणाला, ‘‘बऱ्याच कालावधीनंतर नेदरलॅण्ड्सला हरवल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. अव्वल क्लब्सविरुद्ध आम्ही आक्रमक आणि वेगवान खेळ करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा आम्हाला जागतिक लीग स्पर्धेत नक्कीच होईल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा