Raunak Sadhwani: रौनक साधवानी याच्यासाठी लहानपणापासूनच क्रिकेट म्हणजे एक जग होते. मात्र, तो त्याचा काही कारणास्तव त्याला त्यात फारसे काही करता आले नाही. एवढे प्रयत्न करूनही तो त्याला क्रिकेटमध्ये यश येत नव्हते. कामगिरी उत्तम होत होती मात्र पुढे काहीच होत नव्हते यामागील कारणाचा तो पाठपुरावा करू शकला नाही. नागपुरातील कोणत्याही क्रिकेट क्लबने या पाच वर्षांच्या मुलाला ट्रेनिंग देण्यास होकार दिला नाही. कठीण चेंडूचा सामना करण्यासाठी तो खूपच लहान असल्याने त्याला आम्ही घेऊ शकत नाही असे कारण सांगून सर्वांनी प्रवेश नाकारला. मग त्याने क्रिकेट सोडून बुद्धिबळ खेळाकडे वळला आणि आज अवघ्या १३व्या वर्षी ६४ घरांचा राजा झाला.  

क्रिकेटमध्ये परत जाण्याची योजना होती पण तसे होऊ शकले नाही

“मी क्रिकेट खेळायचो आणि माझ्या वयानुसार खूप चांगला फलंदाज होतो. मात्र, मी ज्या क्लबसाठी खेळत होतो त्यांनी मला सांगितले की मी १० किंवा ११ वर्षांचा होईपर्यंत अधिकृतपणे त्यांच्यासाठी खेळू शकत नाही. मी त्यांना यावर पुढे म्हणालो, तोपर्यंत मी बुद्धिबळ खेळेन आणि मग आम्ही पुन्हा क्रिकेटकडे वळू.” रौनक दुबईहून इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हणाला. सध्या तो ग्लोबल चेस लीगच्या उद्घाटन हंगामात ‘बालन अलास्कन नाइट्स’कडून खेळत आहे.

Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Devendra Fadnavis, Devendra Fadnavis visit to Nagpur,
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी
World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

रौनक बुद्धिबळात इतका रमला की त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा कधी वळून देखील पाहिले नाही. त्याने बोलताना सांगितले की, “ १० किंवा ११ वर्षानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये जाईन असे म्हटले होते पण आता बुद्धिबळ या खेळात इतका गुंतलो की याची आवड कधी निर्माण झाली कळेलच नाही.” २०१९मध्ये, जेव्हा तो फक्त १३ वर्षांचा होता, तेव्हा तो ग्रँडमास्टर बनणारा जगातील नववा सर्वात तरुण बुद्धिबळपटू बनला. भारतातील तो चौथा सर्वात युवा चेस ग्रँडमास्टर बनला.

हेही वाचा: ENG vs AUS 2nd Test: लाबुशेनने असे काही केले की ऑस्ट्रेलियावर आली तोंड लपवण्याची वेळ; live सामन्यातील VIDEO व्हायरल

नागपूरचा असूनही, त्याने याआधी एकही ग्रँडमास्टर स्पर्धा खेळली नव्हती, रौनकने त्याची नवीन कारकीर्द थेट ग्रँडमास्टर झाल्यानंतरच पुढे आकाराला आली. झपाट्याने विस्तारणाऱ्या भारतीय बुद्धिबळ परिसंस्थेचा त्याला किती फायदा झाला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तो सध्या नागपूरला स्थायिक झालेल्या GM स्वप्नील धोपडे यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तसेच त्याचे आणखी एक  गुरु GM अभिजित कुंटे यांच्याकडून तो बुद्धिबळ खेळाचे ज्ञान आत्मसात करत आहे.

वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी विश्वनाथन आनंद यांनी निवडलेल्या किशोरवयीन ग्रँडमास्टर मास्टर गटाचाही तो भाग होता. WACA मध्ये, त्याने पाच मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली खेळातील बारकावे शिकले आहेत जे त्याचे बुद्धी कौशल्य आणि दृष्टिकोन दर्शवतात. याचा त्याला मोठ्या सामन्यात खूप फायदा झाला.

हेही वाचा: Sourav Ganguly: गांगुलीचा सरफराजला पाठिंबा! म्हणाला, “ तुम्हाला त्याच्या कौशल्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही जर…”

गेल्या काही महिन्यांत त्याचा खेळ खूप मजबूत आणि परिपक्व झाला आहे. बुद्धिबळातील सर्वात दिग्गज खेळाडू क्रॅमनिक ४४व्या, या खेळातून निवृत्त झाला. तो म्हणाला की, “मला खात्री आहे की रौनक अव्वल बुद्धिबळपटू बनेल.” रौनकने त्यांच्या कौतुकावर बोलताना म्हटले की, “क्रॅमनिक सरांचे प्रशिक्षण माझ्यासाठी आयुष्य बदलणारे होते. त्याने मला जे शिकवले ते मी माझ्या खेळातही समाविष्ट केले आहे. यामुळे मला मानसिकदृष्ट्या खूप बळ मिळाले.”

Story img Loader