SA vs NED, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सने मंगळवारी (१७ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून एकच खळबळ उडवून दिली. या स्पर्धेतील हा दुसरा मोठा पराभव आहे. नेदरलँड्सपूर्वी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला होता. विश्वचषकातील या मोठ्या पराभवामध्ये पॉल व्हॅन मीकरेनने महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँड्सच्या या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. त्याने एडन मार्कराम आणि मार्को जॅनसेनला बाद केले. एकेकाळी खाद्यपदार्थ पोहोचवणारा हा गोलंदाज आफ्रिकन संघाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार होता. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता.

विश्वचषकाच्या तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार केला होता. अनेक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. अशा परिस्थितीत खेळाडूंची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली होती. त्यापैकी एक होता पॉल व्हॅन मीकरेन. त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये एक ट्वीट केले होते जे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर व्हायरल होत आहे. मीकरेनने लिहिले होते की, “क्रिकेट बंद असल्याने तो फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. त्याने हार मानली नाही आणि जगण्यासाठी अन्न पोहोचवण्याचे काम केले.”

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

मीकरेंची कारकीर्द अशीच होती

३० वर्षीय मीकरेनने २०१३ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. योगायोगाने त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पदार्पण केले. आता त्याच संघाविरुद्धच्या सामन्यानंतर तो चर्चेत आला आहे. मीकरेन नेदरलँड्सकडून १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने २० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत ५७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर ६४ विकेट्स आहेत.

प्रथमच पूर्ण क्रिकेट सदस्य असलेल्या देशाचा पराभव केला

नेदरलँडचा हा पाचवा विश्वचषक आहे. हा संघ २०११ नंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. हा त्याचा २३वा सामना होता, ज्यामध्ये त्याने प्रथमच आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशाचा पराभव केला आहे. यापूर्वी २००३ मध्ये नामिबिया आणि २००७ मध्ये स्कॉटलंडचा पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिका-नेदरलँड सामन्यात काय घडलं?

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि दोन्ही डाव प्रत्येकी सात षटकांचे करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडची सुरुवात काही खास नव्हती. निम्मा संघ ८२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने तळाच्याच्याफलंदाजांबरोबर अप्रतिम भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने नाबाद ७८ धावा केल्या. व्हॅन डर मर्वेने २९ आणि आर्यन दत्तने ९ चेंडूत २३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: World Cup 2023: गौतम गंभीरने बाबर आझमला दिला खास सल्ला; म्हणाला, “पाकिस्तानसाठी तुम्ही किती धावा करता यापेक्षा…”

२४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही काही खास नव्हती. ३६ धावांवर पहिली विकेट पडली. डी कॉक २० आणि कर्णधार बावुमा १६ धावा करून बाद झाला. मार्कराम एक तर डसेन चार धावा करून बाद झाला. क्लासेन आणि मिलरने पाचव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून काही आशा उंचावल्या, पण क्लासेन बाद झाल्यानंतर मिलर एकाकी पडला. यानसेन नऊ धावा करून बाद झाला. यानंतर मिलरही ४३ धावा कारण बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव अटळ आहे हे निश्चित झाले. कोटझेने २२, रबाडाने नऊ धावा केल्या. शेवटी केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांना संघाची धावसंख्या २०७ धावांपर्यंतच नेता आली आणि नेदरलँड्सने सामना ३८ धावांनी जिंकला.

Story img Loader