Sourav Ganguly On Women Premier League:  सध्या सर्वत्र महिला आयपीएलची चर्चा होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासाठी हे मोठे यश म्हणून अनेकजण याकडे पाहत आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि अध्यक्ष सौरव गांगुली याने महिला आयपीएल अर्थात महिला प्रीमियर लीगबाबत मोठा खुलासा केला आहे.

खरे तर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा सौरव गांगुलीला विचारण्यात आले की, “महिला आयपीएलची कल्पना तुमची होती का?” त्याला उत्तर देताना दादा म्हणाले, “फक्त मीच नाही तर सर्वांनी मिळून केले होते. तत्कालीन उपाध्यक्ष राजीव शुक्ला, अरुण धुमाळ, जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे चेअरमन ब्रजेश पटेल या सर्वांनी मिळून त्याची तयारी केली होती. आता त्याची अंमलबजावणी झाली असल्याचे त्याने सांगितले.”

महिला खेळाडूंमध्ये खूप ताकद असून ही स्पर्धा केवळ ५ संघांपुरती मर्यादित नसावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष पुढे म्हणाले, “भारतात क्रिकेट हा खेळ खूप मोठा असून तो सर्व ठिकाणी खेळला जातो. त्यामुळेच हा विचार लक्षात घेऊनच महिलांच्या आयपीएलमधील रस पाहून मला आश्चर्य वाटत नाही. मला समजते की पुढे जाऊन ते फक्त पाच संघांपुरते मर्यादित राहणार नाही. जसजसे आयपीएल कालांतराने वाढले आहे, आणखी प्रोत्साहन दिले तरच ते पुढे अधिक वाढेल.”

हेही वाचा: IND vs NZ 1st T20: पृथ्वी शॉ ला आजच्या सामन्यात स्थान मिळणार का? कशी असेल न्यूझीलंडविरुद्ध भारताची प्लेईंग ११

“महिला खेळाडूंना पुरुष क्रिकेटपटूंच्या बरोबरीने मानधन देण्याचीही तुमची कल्पना होती का?” त्याला उत्तर देताना दादा म्हणाला, “आम्ही महिला क्रिकेटला खूप वेळ दिला होता. कोविड मध्ये दोन वर्षे गेली, त्यामुळे काही गोष्टी अडकून राहिल्या. महिला क्रिकेटने खूप पुढे मजल मारली आहे. जेव्हा मी २०१९ मध्ये अध्यक्ष झालो आणि त्यानंतर २०२२ मध्ये माझा कार्यकाळ संपला तेव्हा या तीन वर्षांत मी महिला क्रिकेटचा विकास होताना पाहिला आहे. मात्र याचे श्रेय महिला खेळाडूंना द्यायला हवे. ती खूप चांगली कामगिरी करत आहे.

हेही वाचा: MS Dhoni in Ranchi: नारळपाण्यासह ‘थलायवा माही’ पोहोचला थेट टीम इंडियाच्या भेटीला! इशान, हार्दिकची फिरकी घेणारा Video व्हायरल

विराट कोहलीचा शानदार फॉर्म

माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या खेळीचे देखील कौतुक केले. “विराट कोहली शानदार खेळी करत आहे. त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कसोटीत देखील छाप सोडली आहे. लवकरच तो सर्व दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडणार.” असे म्हणत त्याने त्याच्या फलंदाजीवर भाष्य केले.

Story img Loader