भारत आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केपटाऊन कसोटीत पहिल्याच दिवशी तब्बल २३ विकेट्स पडल्या. एका दिवसात इतक्या विकेट्स पडण्याचे अनेक विक्रम प्रस्थापित झाले. एकाच दिवसात तिसरा डाव सुरू होण्याचा अनोखा प्रकारही झाला. सेंच्युरियन इथे झालेली पहिली कसोटी तीन दिवसात आटोपली होती. ही कसोटी त्याहूनही कमी वेळात संपेल अशी चिन्हं आहेत. कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स यानिमित्ताने खेळपट्टीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खेळपट्टी आणि आऊटफिल्ड यासंदर्भात आयसीसीचं मानकं अतिशय काटेकोर आहेत. खेळपट्टीचा दर्जा योग्य नसल्यास कारवाईही होते. काय आहेत हे नियम जाणून घेऊया.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी क्युरेटर खेळपट्टी तयार करतात. खेळपट्टीसंदर्भात आयसीसीच्या नियमावलीनुसार खेळपट्टी तयार होते. फक्त यजमान संघालाच फायदा होईल अशा पद्धतीने खेळपट्टी तयार केली जात नाही.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका

प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना संपल्यानंतर सामनाधिकारी खेळपट्टी आणि आऊटफिल्डसंदर्भात एक अहवाल तयार करतात. कसोटी, एकदिवसीय तसंच ट्वेन्टी२० अशा तीन प्रकारांसाठी स्वतंत्र प्रारुप असतं. सामनाधिकारी त्यांचा अहवाल आयसीसीच्या सीनिअर क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजरकडे पाठवतात.

‘द पिच अँड आऊटफिल्ड रिपोर्ट’ असं या अहवालाचं औपचारिक नाव असतं. आयसीसीच्या नियमावलीतील नियम ‘क’ मध्ये उल्लेख केलेल्या गोष्टींचा या अहवालात अंतर्भाव असतो. खेळपट्टी आणि आऊटफिल्डबाबत दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया अहवालात नमूद करण्यात येतात. या सामन्यासाठी नियुक्त पंचांचं मतही नोंदवलं जातं.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर १४ दिवसात, आयसीसीचे सीनिअर क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर हा अहवाल यजमान क्रिकेट बोर्डाला पाठवतात. अहवालाची एक प्रत पाहुण्या संघाच्या क्रिकेट बोर्डाला पाठवली जाते.

खेळपट्टीला डीमेरिट पॉइंट्स देण्यात आले असतील तर आयसीसीकडून यजमान क्रिकेट बोर्डाला यासंदर्भात सूचित केलं जातं.

हेही वाचा: Ind vs SA: ब्रेक्झिट दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या पथ्यावर; कोलपॅक रिटर्न्डची वाढती संख्या

खेळपट्टीचं गुणांकन कसं केलं जातं?

आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन ज्या मैदानावर होणार आहे तिथे सर्वोत्तम खेळपट्टी आणि आऊटफिल्ड असेल अशी अपेक्षा असते.

सामनाधिकारी व्हेरी गुड, गुड, ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज, पूअर आणि अनफिट असं श्रेणीनिहाय गुणांकन करतात. गुणांकन पहिल्या तीन श्रेणींमध्ये झालं तर खेळपट्टी चांगली आहे असा निष्कर्ष निघतो.

बिलो ॲव्हरेज अर्थात सरासरी दर्जाहून खाली असा शेरा देण्यात आला तर डिमेरिट पॉइंट दिले जातात. बिलो ॲव्हरेज पिचला १ डिमेरिट पॉइंट दिला जातो. खेळपट्टीला पूअर अर्थात निकृष्ट/सुमार शेरा देण्यात आला तर ३ डिमेरिट पॉइंट देण्यात येतात. आऊटफिल्डकरता २ डिमेरिट पॉइंट दिले जातात. खेळपट्टी आंतरराष्ट्रीय लढतीसाठी अयोग्य असा शेरा मिळाला तर पिचला ५ डिमेरिट तर आऊटफिल्डला ५ डिमेरिट पॉइंट मिळतात.

डिमेरिट पॉइंट पाच वर्षांसाठी लागू राहतात.

यजमान मैदानाला खेळपट्टी आणि आऊटफिल्डसाठी ५ किंवा त्याहून जास्त डिमेरिट पॉइंट मिळाले तर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई होते. वर्षभर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना त्या खेळपट्टीवर आयोजित केला जाऊ शकत नाही.

यजमान मैदानाला खेळपट्टी आणि आऊटफिल्डसाठी १० किंवा त्याहून जास्त डिमेरिट पॉइंट मिळाले तर २ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई होते. दोन वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी त्या मैदानावर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकत नाही.

एखाद्या मैदानातील खेळपट्टी आणि आऊटफिल्ड दोघांनाही समान शेरा मिळाला तर जो आकडा मोठा आहे तो ग्राह्य धरला जातो. उदाहरणार्थ एखाद्या मैदानातील खेळपट्टी आणि आऊटफिल्डला पूअर असा शेरा मिळाला. खेळपट्टीसाठी ३ तर आऊटफिल्डसाठी २ डिमेरिट पॉइंट असतील तर ३ गुण ग्राह्य धरले जातील.

एखाद्या मैदानाला आऊटफिल्डसाठी डिमेरिट पॉइंट देण्यात आले आणि त्या मैदानावर लगेचच आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत अशी स्थिती आहे. आऊटफिल्ड सुधारण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. असं असेल तर पुढच्या दोन महिन्यात देण्यात येणारे डिमेरिट पॉइंट्स आधीच्या पॉइंटमध्ये अॅड होत नाहीत.

डिमिरेट पॉइंटची संख्या वाढून मैदानावर निलंबनाची कारवाई झाली तर आयसीसी संबंधित बोर्डाला लेखी स्वरुपात तसं कळवतं.

संबंधित बोर्ड सामनाधिकाऱ्यांच्या अहवालाविरोधात दाद मागू शकतं. डिमेरिट पॉइंट्स किंवा निलंबनाची कारवाई यासंदर्भात सूचित केल्यानंतर १४ दिवसात संबंधित बोर्ड सामनाधिकाऱ्यांचा अहवाल तसंच निलंबनाची कारवाई याविरोधात दाद मागू शकतं.

दाद मागितल्यानंतर १४ दिवसात आयसीसी जनरल मॅनेजर आणि क्रिकेट कमिटी चेअरमन यांच्यासमोर सुनावणी होते आणि ते दादकर्त्यांची बाजू ऐकून घेतात.

आयसीसी जनरल मॅनेजर किंवा क्रिकेट कमिटी चेअरमन खालील निकषांवर आधारित निर्णय देतात.

हेही वाचा: Ind vs SA: आयपीएल फ्रँचाइजींचा वाढता पसारा टेस्ट क्रिकेटच्या मुळावर?

सामनाधिकाऱ्यांचा अहवाल
-संबंधित बोर्डाकडून मैदानासंदर्भात सादर केलेला अहवाल
-सामन्याचे व्हीडिओ
-यजमान बोर्डाने कारवाई होऊ नये यासाठी केलेला युक्तिवाद

आयसीसी जनरल मॅनेजर-क्रिकेट आणि क्रिकेट कमिटी चेअरमन यांनी सर्व बाजू ऐकल्यानंतर लेखी स्वरुपात आपला निर्णय आयसीसीला कळवणं अपेक्षित आहे.

आयसीसी जनरल मॅनेजर-क्रिकेट आणि क्रिकेट कमिटी चेअरमन यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.

खेळपट्टीला गुणांकन देतानाचे निकष आणि नियमावली

खेळपट्टी तयार करणं हे कौशल्याचं आणि गुंतागुंतीचं काम आहे हे आयसीसी जाणतं. देशनिहाय तसंच विशिष्ट शहर तसंच मैदान यानुरुप परिस्थिती बदलते. भौगोलिक गोष्टींमुळेही फरक पडतो. या सगळ्याचा परिणाम खेळपट्टी निर्मिती आणि तिच्या स्वरुपावर होतो. हे बदल खेळाचा अविभाज्य घटक आहेत असं आयसीसी मानते. खेळपट्टीवर चेंडूचं काय होतं, खेळ कसा होतो यानुसार गुणांकन दिलं जातं. त्याबरोबरीने कोणत्या संघांदरम्यान मुकाबला आहे आणि खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी हेही पाहिलं जातं.

कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टी
कसोटीच्या पाचही दिवशी गोलंदाज आणि फलंदाजांना त्यांचं कौशल्य सिद्ध करण्याची समान संधी मिळावी. बॅट आणि बॉल यांच्यातील मुकाबला बॉलर्सच्या दिशेने झुकल्यास, खेळपट्टी दिवसागणिक खराब होत जाते. चेंडूला मिळणारी उसळी अनियमित स्वरुपाची असते. कधी चेंडू खाली राहतो, कधी प्रचंड उसळी घेतो. चेंडूचं वर्तन लहरी होतं.

विशिष्ट गुणांकन
व्हेरी गुड- चेंडूची चांगल्या पद्धतीने हालचाल. सामन्याच्या सुरुवातीला चेंडूला चांगली उसळी मिळते. मर्यादित सीम मूव्हमेंट. जसजसे दिवस पुढे जातात तसं चेंडू वळू लागतो. तिसऱ्या दिवसापासून फिरकीला अधिक मदत मिळू लागते.

गुड- चेंडूची हालचाल समाधानकारक. चांगली उसळी मिळते. पहिल्या दिवसापासूनच फिरकीला अनुकूल अशी खेळपट्टी. व्हेरी गुड निकषात बसेल एवढी उसळी आणि हालचाल नाही.

ॲव्हरेज- चेंडूची हालचाल नीट होत नाही. क्वचित सीम मूव्हमेंट. चेंडूला उसळी चांगल्या प्रमाणात मिळते. फिरकीपटूंना सहाय्य मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेटकीपरपर्यंतचा त्याचा प्रवास, उसळी आणि फिरकीला मदत या निकषांवर अल्प गुण

बिलो ॲव्हरेज- चेंडूला धड उसळी नाही. चांगल्या पद्धतीने हालचालही नाही. धोकादायक नाही पण अनियमित स्वरुपात चेंडूला उसळी मिळत असेल तर पहिल्या तीन श्रेणीत खेळपट्टी बसत नाही मग भले चेंडूला फिरकील साथ देणारी का असेना.

पूअर- बॅट आणि बॉल यांच्यात सम मुकाबला होऊ शकत नाही अशी खेळपट्टी. फक्त फलंदाजांनाच अनुकूल किंवा गोलंदाजांनाच साथ देणारी असं स्वरुप असतं. अतिरिक्त सीम मूव्हमेंट, चेंडूला उसळी मिळण्याची वारंवारता असमान, फिरकीपटूंना प्रचंड प्रमाणात साथ, खेळपट्टीत ओलसरपणा असल्यामुळे किंवा कोरडेपणा असल्यामुळे खेळणं कठीण अशी स्थिती.

अनफिट- ज्या खेळपट्टीवर खेळणं खेळाडूंच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतं तिला अनफिट घोषित केलं जातं.

वनडे आणि ट्वेन्टी२० सामन्यांसाठीची खेळपट्टी आणि आऊटफिल्ड याकरता वेगळी नियमावली आणि निकष तयार करण्यात आले आहेत. त्यामध्येही गोलंदाज आणि फलंदाज यांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची समान संधी मिळावी असाच विचार मूलभूत मानण्यात आला आहे.

आऊटफिल्ड
आऊटफिल्डच्या पृष्ठभागात नियमितता असणं. ग्रास कव्हर अर्थात गवताचं आच्छादन असणं. चेंडू किती वेगाने जातोय हेही काटेकोरपणे पाहिलं जातं. कोणत्या वारंवारतेने चेंडूला उसळी मिळते हे बघितलं जातं. चेंडूला उसळी मिळताना क्षेत्ररक्षकांसाठी ते सुरक्षित आहे ना हे लक्षात घेतलं जातं. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास किती कालावधीत आऊटफिल्ड पूर्ववत होऊन खेळ सुरू करता येऊ शकतो हे ध्यानात घेतलं जातं.

आऊटफिल्ड गुणांकन
व्हेरी गुड- अतिशय उत्तम असं गवताचं आच्छादन. मध्येच उजाड आणि काही ठिकाणी गवताचे पुंजके अशी स्थिती नाही. चेंडूला उसळीत नियमितता.

गुड- गवत नीट प्रमाणात देखभाल केलेलं. नियमित उसळली.

ॲव्हरेज- गवत समाधानकारक स्थितीत पण चेंडूला उसळीत मिळण्यात नियमितता नाही

ॲव्हरेज- गवताचं आच्छादन विस्कळीत स्वरुपात. मध्यम स्वरुपाचा वेग. पाणी वाहून नेण्याची व्यवस्था संथ गतीची. यामुळे पावसामुळे बाधित सामना पुन्हा सुरू होण्यास विलंब. पाऊस किती वेळ झाला आणि पाणी बाहेर काढण्यासाठी लागलेला वेळ या संदर्भातून परीक्षण केलं जातं.

पूअर- अतिशय अनियमित स्वरुपाची चेंडूला मिळणारी उसळी आणि वेग. ड्रेनेज यंत्रणा समाधानकारक स्वरुपाची नाही.

अनफिट- गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना खेळण्यासाठी धोकादायक