बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सन्मान केला. त्यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार २००५ ते २००८ या दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष होते. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद कसं मिळालं, याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला. “भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना सुरु होता. टीम इंडियाचा कर्णधार राहुल द्रविडने मला सांगितलं की, कर्णधारपदामुळे फलंदाजीवर परिणाम होत आहे. त्यामुळे राजीनामा देऊ इच्छित आहे.”, असं द्रविडने सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. त्यानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असा प्रश्न पडला होता. तेव्हा सचिन तेंडुलकरला पुन्हा कर्णधार करण्याचा विचार आला. मात्र त्यानेही नकार दिल्याचं पवारांनी सांगितलं.
“मी सचिन तेंडुलकरला कर्णधारपद स्वीकारण्यास सांगितलं. मात्र त्याने कर्णधारपद स्वीकारण्यास मनाई केली. मग मी सचिनलाच विचारलं आता संघाचं नेतृत्व कुणाला द्यायचं. तेव्हा सचिनने धोनीचं नाव सुचवलं. त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा दिल्यास देशाचं नाव उज्ज्वल करेल आणि त्यानंतर झालंही तसंच”, असं शरद पवारांनी सांगितलं. धोनी आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमात्र कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघाने एकदिवसीय विश्वचषक, वर्ल्ड टी २० आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.
IPL 2021: ‘महि’ मार रहा है; राजस्थानच्या स्फोटक फलंदाजानं पंजाबला केलं हैराण!
ललित मोदी यांचं आयपीएल निर्मितीत खूप कष्ट : शरद पवार</strong>
“आयपीएल सुरु करण्यात ललित मोदी यांचं कौतुक आहे.आयपीएलच्या निर्मितीत त्याने खूप कष्ट घेतले आहे.भारताने जगाला दिलेला एक देखणा आणि आपण सुरु केलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटच सगळं अर्थकारणच बदलून गेलं आहे. जगातील उत्तम खेळाडू आपल्या इथं खेळण्यासाठी येऊ लागले. यातून नव्या पिढीला त्यांच्या बरोबर खेळण्याची संधी मिळाली.”, अशा शब्दात शरद पवार यांनी ललित मोदी यांचं भाषणात कौतुक केले. या भाषणानंतर शरद पवार यांना ललित मोदीच्या वादग्रस्त प्रवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “मी ललित मोदींच कौतुक केलं. कारण आयपीएल सुरू करण्यात योगदान आहे. बाकी काही”