ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. क्रीडा जगताचा सर्वोच्च मेळा असं वर्णन होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ठसा उमटवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ पदकांवर नाव कोरलं होतं. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकावर नाव कोरत इतिहास घडवला होता. यंदा सुवर्णपदकासह एकूणच पदकांचा आकडा वाढवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. या ऑलिम्पिकच्या निमित्ताने लोकसत्ता तुमच्यासाठी घेऊन आलंय नवंकोरं क्विझ. भारतीय ऑलिम्पिकपटूंची ऑलिम्पिकमध्ये कामगिरी कशी आहे याबाबत हे क्विझ आहे. तुम्हाला या क्विझच्या निमित्ताने ऑलिम्पिक आठवणींना उजाळा देता येईल. ज्या खेळाडूंनी देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे त्यांच्याबद्दलची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत.