How Much Prize Money Pakistan Got After Champions Trophy: म्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान संघाची मोहिम निराशाजनक राहिली. पाकिस्तानचे सुरूवातीचे दोन सामने गमावत गट टप्प्यातून बाहेर पडले आहेत. तब्बल २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे पाकिस्तानात आयोजन करण्यात आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाकिस्तान संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. पाकिस्तान संघाला एकही सामना जिंकता आला नाही. बांगलादेशविरुद्धचा अखेरचा साखळी सामना देखील रद्द झाला.
पाकिस्तानचा संघ गट टप्प्यातून बाहेर पडला असला तरी आयसीसीकडून पाकिस्तान संघाला कोट्यवधींची बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अ गटातील गुणतालिकेवर पाकिस्तान संघ शेवटच्या स्थानावर आहे. बांगलादेशविरूद्धचा अखेरचा सामना रद्द झाल्याने आता पाकिस्तान संघ अखेरच्या स्थानी एकही सामना न जिंकत राहिला आहे.
तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC कोट्यवधी रुपये बक्षीस देणार आहे. संघही एकही सामना जिंकलेला नसला तरी आयसीसीच्या परंपरेनुसार त्याला बक्षीस रक्कम म्हटले जाईल. पाकिस्तानला ICC कडून बक्षीस म्हणून सुमारे २ कोटी ३७ लाख रुपये मिळणार आहेत. यामधील १ कोटी २२ लाख रुपये गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना मिळणार होते, त्यामुळे पाकिस्तानला ती रक्कम मिळेल.
यासह सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला २९.५ लाख रूपये मिळतील. बांगलादेशविरूद्धचा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना याची अर्धी किंमत मिळेल. म्हणजेच पाकिस्तानला १५ लाख रूपये मिळतील. याशिवाय आयसीसीने यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना प्रत्येकी १.०८ कोटी स्वतंत्र रक्कम देण्याची घोषणा केली होती. अशा प्रकारे एकूण पाकिस्तान क्रिकेट संघाला २ कोटी ३७ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. आयसीसीकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यजमानपद भूषवल्याची वेगळी रक्कम मिळणार आहे.
१९९६ नंतर पाकिस्तानमध्ये होणारी ही पहिली जागतिक क्रिकेट स्पर्धा आहे. जी कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवली जात आहे. मात्र, भारताचे सामने दुबईत आयोजित केले जात आहेत. यंदाच्या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये आठ संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. अ गटातून भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश बाहेर पडले आहेत. इंग्लंड ब गटातून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे सध्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत.