History and Significance of Wankhede Stadium Mumbai: मुंबई म्हणजे क्रिकेटचं हब अन् या मुंबईतील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम म्हणजे वानखेडे स्टेडियम. १९७५ पासून मुंबईतील हे स्टेडियम अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार झालं आहे. रवी शास्त्रींचे सहा चेंडूत सहा षटकार, २०११ चा भारताचा विश्वचषक विजय, सचिन तेंडुलकरची अखेरची कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भावुक करणारी निवृत्ती, हे आणि असे अनेक क्षण या वानखेडे स्टेडिमयने अनुभवले आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि अशा अनेक मुंबईच्या खेळाडूंचं हे माहेरघर आहे. मुंबईतील या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला यंदा १९ जानेवारी २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. पण वानखेडे स्टेडियमची ही निर्मिती कशी झाली याची रंजक गोष्ट जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेले वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत आधीपासूनच ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. हे स्टेडियम CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असून मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने या स्टेडियमवर खेळले जायचे. त्या काळी ते खूप प्रसिद्ध स्टेडियम होते. १९४८ नंतर १९७३ पर्यंत भारतात होणारे क्रिकेट सामने हे ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जायचे. ब्रेबॉर्न स्टेडियम हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचे होते. याच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (आताचं मुंबई क्रिकेट असोसिएशन) यांच्यात वादातून वानखेडे स्टेडियमचा जन्म झाला.

हेही वाचा – Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”

कसा झाला मुंबईतील पहिल्या स्टेडियमचा जन्म?

१९३३ मध्ये ज्यावर्षी भारतात पहिला कसोटी सामना खेळला गेला त्याचवेळेस CCI म्हणजेच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची स्थापना झाली. या संस्थेने भारतातील पहिलं क्रिकेट स्टेडिमय बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. पण समोर मुख्य अडचण होती ती म्हणजे जागा. मुंबईत इतका मोठं भूखंड विकत घेणं आवाक्यबाहेरचं होतं. त्याकाळात कुलाबामधील बॅकबे रिक्लमेशनचा चौथा टप्पा सुरू होता. भराव टाकून विकलेली जमीन बाजारभावात विकली जायची. सीसीआयने सरकारकडे अर्ज केला की, स्टेडियमकरता १८ चे २० एकराचा भूखंड स्टेडियमकरता विनामूल्य त्यांना देण्यात यावा, सरकारने ही मागणी लगेचच फेटाळली. तेव्हा एँथनी डिमेलो हे सीसीआयचे सचिव होते. तेव्हा विविध समाज होते आणि ते गोयकर या समाजाचे असल्याने गोयकर समाजात त्यांचा दबदबा होता. त्यांचे मित्र होते आंतेनियो पियांदाद द क्रूझ. आंतेनियो हे ख्यातनाम चित्रकार होते आणि लोक त्यांना क्रुझो या नावाने ओळखत असत. विविध श्रीमंत लोक आणि राजकारणी हे त्यांच्याकडे खास तैलचित्र काढून घेण्यासाठी यायचे.

हेही वाचा – Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”

डिमेलोंने कळलं की त्यावेळी क्रुझो मुंबईच्या गव्हर्नरांचं चित्र काढत होते. त्यांनी क्रुझोंना विनंती केली की गर्व्हनर साहेबांना स्टेडिमयसाठी तो भूखंड देण्यासाठी शब्द टाकावा. क्रुझो यांनी त्यावेळी सीसीआयच्या वतीने क्रुझो यांना विनंती केली. त्यावर गव्हर्नर भडकून म्हणाले, की तुम्हाला माहित आहे समुद्रात भराव टाकून जमीन बनवणं हे किती महाग आहे ते… आणि यांनाही फुकटात हवी आहे. क्रुझोंनी शांतपणे त्यांना विचारलं, तुम्हाला सरकारच्या तिजोरीत पैसा जमा करायचा आहे की स्वत:चं नाव अजरामर बनवायचं आहे. गव्हर्नर साहेबांना क्रुझोंनी एक अशी ऑफर दिली की त्यांना नाही म्हणताच आलं नाही आणि त्यांनी ती जमीन सीसीआयच्या ताब्यात आली. सीसीआयने ठरवलं की हे स्टेडियम लॉर्ड्स ऑफ इंडिया झालं पाहिजे आणि त्याकरिता त्यांनी त्यावेळचे विख्यात वास्तुविशारद ग्रेगसन बेटली आणि किंग यांना नव्या स्टेडियम आणि क्लबहाऊसचा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त केलं. या भव्य इमारतीचे कंत्राटदार होते शापुरजी पालोनजी. विख्यात लेखक सायमन इंगलेस यांच्यामते जगात १९३० च्या दशकात बांधलेल्या स्टेडियमपैकी ब्रेबॉर्न स्टेडियम हे पहिल्या ४-५ स्टेडिमयमध्ये मोडतं.

हेही वाचा – VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह

ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई

२२ मे १९३६ ला गव्हर्नर या पायाभरणी समारंभाला उपस्थित होते. क्रुझोंनी नेमकी काय खेळी केली होती, ज्यामुळे एवढा मोठा भूखंड सीसीआयला फुकटात मिळाला. क्रुझो यांनी या स्टेडियमला गव्हर्नरांचं नाव देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि गव्हर्नरांचं नाव होतं लॉर्ड ब्रेबॉर्न. म्हणून वास्तुचं नाव पडलं ब्रेबॉर्न स्टेडियम. आता क्रुझोंचाही यात फायदा झाला. या स्टेडिमयला लागून एक स्टेडिमय हाऊस नावाची इमारत उभारली होती, त्यात क्रुझोंचा नवा स्टुडियो उभा राहिला. यानंतर ७० च्या दशकात सुरू होते वानखेडे स्टेडियमची कहानी.

हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळणार नाही? ब्रिटेनच्या नेत्यांचं क्रिकेट बोर्डाला पत्र

ब्रेबॉर्न स्टेडिमय असताना वानखेडे स्टेडिमय का उभारलं?

७० च्या दशकात मुंबईमध्ये क्रिकेटचा कारभार सांभाळणारी संस्था होती बीसीए (BCA) म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशन. ज्याला आता एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणतात. सीसीआय आणि बीसीएमध्ये बिलकुल सामंजस्य नव्हतं. ‘इंग्रज गेले पण आता आम्ही नवे इंग्रज’ असा थाट सीसीएचा होता. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए यांनी स्टेडियममधील जागा कशा वाटून घ्याव्यात, याच्यावर नेहमी वाद व्हायचे. खटके वाढू लागल्यानंतर बीसीएने नवं स्टेडियम बांधायचं ठरवलं अन् ते फक्त ब्रेबॉर्न स्टेडियमपासून ५०० मीटर अंतरावर. पण खरंतर वानखेडे स्टेडियम उभारलं ते म्हणजे मराठी माणसाच्या अपमानातून.

विजय मर्चंट आणि शेषराव वानखेडे यांच्यात का झाला वाद?

१९७२ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. विदर्भामध्ये जन्मलेले वानखेडे हे क्रिकेटप्रेमी होतेच पण बीसीएचे अध्यक्षही होते. त्यांच्याकडे काही तरूण आमदार बेलिफेट मॅचचा प्रस्ताव घेऊन आले. शेषराव वानखेडे यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्याचं ठरवलं. त्यावेळेस सीसीएचे अध्यक्ष होते ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट. वानखेडेंसह आमदारांंचं शिष्टमंडळ मर्चंट यांची भेट घेण्यासाठी गेले. पण मर्चंट यांनी ही मागणी फेटाळून लावली. शब्दाला शब्द लागला आणि वातावरणही गरम झालं.

शेषराव वानखेडे

विजय मर्चंट यांचा नकार ऐकून वानखेडे म्हणाले, तुम्ही जर अशीच अरेरावी केली तर आम्हाला बीसीएकरता दुसरं स्टेडिमय उभारावं लागेल. तुम्ही घाटी लोक कधीही असं करू शकणार नाही, असं कुत्सिक उत्तर विजय मर्चंट यांनी दिलं. मर्चंट हे गुजराती श्रीमंत कुटुंबातील होते आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा राग त्यांच्या मनात होता. पुन्हा नव्या स्टेडिमयसाठी नव्या जागेचा प्रश्न आलाच. आता चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्टेशनदरम्यान रेल्वे लाईनच्या पश्चिमेला एख भूखंड खेळण्याकरता राखीव ठेवल होता, जिथे हॉकी खेळलं जायचं. उरलेल्या भूखंडावर आधीच बीसीएने एक क्लब हाऊस उभारण्यासाठी सुरूवात केली होती.

विजय मर्चंट- भारताचे माजी क्रिकेटपटू

वानखेडे स्टेडियमच्या उभारणीसाठी मराठमोळ्या आर्किटेक्टला पाचारण

वानखेडे स्टेडियमच्या उभारणीसाठी एका तरूण मराठी माणसाला आर्किटेक्ट म्हणून नेमलं जो नुकताच आर्किटेक्ट कॉलेजमधून पास झाला होता. त्याचे शिक्षक प्रो. एमव्ही चांदवडकर बीसीएचे सेक्रेटरी होते आणि तो स्वत: शिवाजी पार्कमध्ये पूर्वी क्रिकेट खेळत असे, म्हणून स्टेडिमयचा आर्किटेक्ट होण्याची संधी त्याला मिळाली. वानखेडे स्टेडियमच्या या आर्किटेक्टची पूर्वीची रचना साधी होती. क्लब हाऊसची एक इमारत आणि सात हजार प्रेक्षक बसू शकतील असा स्टॅन्ड. हे मैदान तिन्ही बाजूंनी खुलं राहणार होतं आणि हे आर्किटेक्ट होते प्रख्यात शशी प्रभू. वानखेडे स्टेडियमनंतर प्रभू यांनी दिल्ली, हैदराबाद, नागपूर आणि पुणे या शहरांकरता स्टेडियमची रचना केली.

वानखेडे स्टेडियमच्या उभारणीसाठीची जागा

अन् १३ महिन्यांत उभारलं वानखेडे स्टेडिमय

मुंबईत नवं स्टेडियम बांधण्याच्या विषयावरून वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भेटीला गेले. नवं स्टेडियम बांधण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याचे मुख्यमंत्री नाईक यांनी सांगितले. यावर वानखेडे म्हणाले, तुम्ही फक्त स्टेडियम बांधणीसाठी होकार द्या बाकी सर्व मी पार पाडतो. वानखेडे यांनी देणग्या मिळवायला सुरूवात केली आणि फक्त १३ महिन्यात बीसीए सीसीआयच्या नाकावर टिचून नवं स्टेडियम बांधलं. पण भूखंड छोटा असल्यामुळे रचना थोडी तडजोडीची झाली. जर आपण नीट पाहिलं तर कळतं की स्टेडियम हे अगदी रेल्वेरूळांना खेटून आहे. अखेरीस वानखेडेंनी घेतलेल्या परिश्रमामुळे स्टेडियमला त्यांच नाव देण्यात आलं.

वानखेडे स्टेडिमय उभारणीनंतर

वानखेडे स्टेडिमय हे फक्त क्रिकेटचं नाही, या स्टेडियमवर इतरही काही कार्यक्रम पार पाडले आहेत. रिलायन्सच्या वार्षिक सभा, १९९० मध्ये डायमंड किंग भरत शाहा यांनी आपल्या मुलीचं लग्न वानखेडे स्टेडियमवर केलं होतं. भरत शाह यांनी या लग्नासाठी राजस्थानी राजवाड्याचा सेट उभारला होता. या स्टेडियमवर २०१४ मध्ये भाजपाचे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता.