India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ही दुसरी आणि शेवटची कसोटी आहे, भारत मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहे. टीम इंडिया दुसरी कसोटी जिंकून ही मालिका बरोबरीत ठेवू इच्छितो. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्यासाठी हा सामना खेळेल. न्यूलॅंड्स क्रिकेट ग्राउंडची खेळपट्टी कशी असेल, येथे मागील कसोटी रेकॉर्ड काय आहे? जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर आतापर्यंत ५९ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले गेले आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात येथे शेवटचा कसोटी सामना खेळला गेला, ज्यात भारताचा पराभव झाला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा अलीकडचा विक्रम चांगला आहे, ज्याने ५९ पैकी २७ कसोटी जिंकल्या आहेत.भारतीय क्रिकेट संघाने याआधी केपटाऊनमध्ये एकूण सहा कसोटी सामने खेळले आहेत, मात्र येथील त्यांचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. आतापर्यंत या मैदानावर टीम इंडियाला एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने भारताला ४ वेळा पराभूत केले आहे तर २ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत खेळपट्टी काय रंग दाखवणार?

न्यूलॅंड्स क्रिकेट ग्राउंडवरील बहुतेक सामन्यांचे निकाल लागले, फार कमी सामने अनिर्णित राहिले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा निकालही येथे लागण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे, ही भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे.पीच क्यूरेटर म्हणाला की,खेळपट्टीवर गवत असेल, पहिल्या कसोटीप्रमाणे येथेही वेगवान गोलंदाजांना मदत होईल. तिसऱ्या दिवसानंतर सामन्यात फिरकी गोलंदाजांना देखील मदत मिळेल. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत होईल, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फलंदाजांना मदत होईल. येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.”

हेही वाचा: Steve Waugh: स्टीव्ह वॉने कसोटी क्रिकेट संपुष्टात आल्याबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाला, “ICCने हस्तक्षेप केला नाही तर…”

येथे सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज डेल स्टेन आहे, ज्याने २९ डावांत ७४ विकेट्स घेतल्या आहेत. या मैदानावर सर्वाधिक विकेट्स घेणारा रबाडा हा सहावा गोलंदाज आहे, त्याने १४ डावात ४२ विकेट्स घेतल्या आहेत. हाच गोलंदाज पहिल्या कसोटीत भारताला अडचणीत आणणारा आणि भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरला, त्यामुळे हा गोलंदाज या खेळपट्टीवरही भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकतो.

बुधवार ३ जानेवारीपासून दुसरी चाचणी सुरू, केपटाऊनमध्ये हवामान कसे असेल?

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता नाही, हलके ढग असतील पण सध्या तरी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस होईल असा कोणताही अंदाज नाही. ताशी २२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ७१ टक्के आर्द्रता राहील.

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूला संधी मिळावी, इरफान पठाणने टीम इंडियाला दिला सल्ला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीचे थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्ट्स एचडी १, स्टार स्पोर्ट्स एचडी २ या अधिकृत प्रसारक चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना टीव्हीवर थेट पाहू शकता. तुम्ही टीव्हीवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॉमेंट्री ऐकू शकता. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला दुपारी २.०० वाजता होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will the cape town pitch be in the second test know when where and how to watch the match for free avw