How India can qualify WTC Final 2024-25 : पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९५ धावांनी विजय मिळवत, डब्ल्यूटीसीची फायनल फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पर्थ कसोटी निकालाने ऑस्ट्रेलियाला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर ढकलले, तर भारताने अव्वल स्थान पटकावले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर विजय मिळवून प्रोटीज संघाला दुसऱ्या स्थानावर नेले, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. डब्ल्यूटीसीची फायनल गुणतालिका तयार होण्यासाठी अजून काही वेळ शिल्लक आहे, पण आता डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी लढती रंजक ठरणार आहेत.
भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे सर्व देश अव्वल दोन स्थानांच्या शर्यतीत आहेत. पर्थ कसोटीतील विजयाने भारताला एक भक्कम पाया दिला आहे, परंतु रोहित शर्माच्या संघाला डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान निश्चित होण्यापूर्वी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. फायनल सामन्यापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची कसोटी मालिका आहे. अशा परिस्थितीत आपण त्या समीकरणांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या मदतीने टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरू शकते.
१. जर भारताने ऑस्ट्रेलियाला ५-०, ४-१, ४-० किंवा ३-० ने हरवले तर..
जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ५-०, ४-१, ४-० किंवा ३-० ने फरकाने जिंकली तर रोहित शर्माचा संघ इतर संघांचे निकाल लक्षात न घेता अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारताने या फरकाने मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियाला फायनलच्या शर्यतीतून दूर करेल. या तीन निकालांमुळे भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि जूनमध्ये लॉर्ड्सवर हा संघ अंतिम सामना खेळताना दिसेल.
u
२. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव केला तर…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवल्यास भारत फायनलसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, यासाठी भारतासाठी दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत करु नये. भारताने ऑस्ट्रेलियावर ३-१ असा विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला तर भारत फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी अनिर्णित राहिली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ३-१ असा विजय भारतासाठी पुरेसा असेल.
३. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-१ ने पराभव केला तर…
भारताचा ऑस्ट्रेलियावर ३-२ असा विजय अंतिम समीकरण अधिक कठीण करेल. अशा निकालानंतर भारताला श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियावरील ३-२ अशा विजयानंतर भारतालला श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना जिंकावा, अशी प्रार्थना करावी लागेल. तसेच, २९ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रीलंकेने किमान एक सामना ड्रा करावा लागेल. निकालांच्या या संयोजनामुळे भारताचे फायनलमधील स्थान निश्चित होईल.
४. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली तर…
बॉर्डर-गावस्कर मालिका अनिर्णित राहिल्यास भारताच्या पात्रतेची शक्यता आणखी कमी होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेला सध्याच्या मालिकेत श्रीलंकेचा २-० असा पराभव करणे आवश्यक असेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका केवळ १-० अशा फरकाने जिंकण्यासाठी भारताला श्रीलंकेसाठी प्रार्थना करावी लागेल. श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर २-० असा विजय भारताचा मार्ग कठीण करेल. केवळ १-० असा विजय भारताला पुढे नेण्यास सक्षम असेल. याशिवाय श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-२ ने मालिका गमवावू नये. असे झाल्यास फायनलसाठी पात्र ठरण्याचा भारताचा मार्ग अधिक खडतर होईल.