नव्या संघात दाखल झाल्यानंतर असलेले अपेक्षांचे ओझे आणि निराशा या सर्वाना पूर्णविराम देत लुइस हॅमिल्टनने मर्सिडिझतर्फे पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याची किमया केली. अव्वल स्थानावरून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने अंतिम रेषेपर्यंत शर्यतीवर वर्चस्व गाजवत हंगेरीयन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. २००८मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या हॅमिल्टनने लोटसच्या किमी रायकोनेनला ११ सेकंदाने मागे टाकत अव्वल क्रमांक प्राप्त केला. रायकोनेनला दुसऱ्या तर रेड बुलच्या सेबॅस्टियन वेटेलला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कारकिर्दीतील हॅमिल्टनचे हे २२वे जेतेपद ठरले. ड्रायव्हर्स अजिंक्यपदाच्या शर्यतीत हॅमिल्टन १२४ गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. हॅमिल्टनने १७२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून रायकोनेन आणि फर्नाडो अलोन्सो अनुक्रमे १३४ आणि १३३ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. हंगेरियन शर्यतीत रेड बुलचा मार्क वेबर चौथा आला. फेरारीचा अलोन्सो आणि लोटसचा रोमेन ग्रॅसजेन यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळवले. सहारा फोर्स इंडियाच्या एकाही ड्रायव्हरला अंतिम दहा जणांमध्ये स्थान मिळवता आले नाही. पॉल डी रेस्टा १८वा आला तर एड्रियन सुटीलला शर्यतीतून माघार घ्यावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा