काविळीचे निदान झाल्याने सलामीवीर गौतम गंभीर आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार असल्याची चर्चा होती, पण मी आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर मात्र कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या जिवात जीव आला आहे. ‘‘मी आयपीएलसाठी उपलब्ध आहे. मला कावीळ झाली असली तरी तिचे स्वरूप गंभीर नाही. त्यामुळे ४-५ दिवसांमध्ये मी तंदुरुस्त होईन, अशी मला आशा आहे’’, असे गंभीरने ‘ट्विट’ केले आहे.
कावीळ झाल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी शिखर धवनच्या जागी विचार करण्यात आला नाही.

Story img Loader