फुटबॉल या खेळाचे मला विलक्षण आकर्षण असल्यामुळेच मी फुटबॉल लीगमध्ये फ्रँचाईजी होऊन या खेळाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करणार आहे, असे चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम याने सांगितले.
अब्राहम याच्या गुवाहाटी फ्रँचाईजीचे उत्तर-पूर्व संयुक्त फुटबॉल क्लब असे नामकरण करण्यात आले. इंडियन सॉकर लीगसाठी परदेशातील चार नामवंत क्लबबरोबर सहकार्य करण्यासाठी अब्राहम उत्सुक झाला आहे. तो म्हणाला, ‘‘या स्पर्धेसाठी येथील संघ असावा हाच माझा मुख्य हेतू आहे. जर हा संघ झाला नसता तर मी कदाचित या स्पर्धेत सहभागी झालो नसतो. संघाचे उत्तर-पूर्व नामकरण करीत या पूर्वेकडील राज्यांमध्येही फुटबॉलची लोकप्रियता अधिक वाढावी हा माझा हेतू आहे.’’परदेशी क्लबविषयी विचारले असता अब्राहम म्हणाला, ‘‘अनेक परदेशी क्लब संघांनी माझ्या फ्रँचाईजीमध्ये स्वारस्य दाखविले आहे. त्यापैकी चार क्लबच्या व्यवस्थापनाशी माझी चर्चा सुरू आहे. लवकरच त्यास अंतिम स्वरूप येईल.’’

Story img Loader