भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून मोहम्मद शमीने आपल्या कामगिरीत सुधारणा करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी मोहम्मद शमीचं नाव पक्क मानलं जात आहे. शमीनेही आपण या स्पर्धेसाठी तयार असल्याचं म्हणत, आपण या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावू असं म्हटलं आहे.
“मध्यंतरीच्या काळात माझ्यासाठी अतिशय खडतर होता. फिटनेससोबत काही खासगी समस्यांमुळेही मला खेळाकडे लक्ष देता आलं नाही. दुखापतीमुळे संघाबाहेर बसून सामने पाहणं अतिशय खडतर असतं. मात्र यामधून मी पुनरागमन करु शकलो ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आगामी विश्वचषकासाठी मी पूर्णपणे तयार असून या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी सज्ज आहे.” शमी India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
अवश्य वाचा – IPL दरम्यान वाईट सवयी लावून घेऊ नका, विराटने सहकाऱ्यांना बजावलं