पंच निर्णय पुनर्आढावा पद्धती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. एन. श्रीनिवासन बीसीसीआयमध्ये सत्तास्थानी असताना तंत्रज्ञान सर्वसमावशेक नसल्याने भारताने नेहमीच डीआरएस पद्धतीला विरोध केला. महेंद्रसिंग धोनीनेही श्रीनिवासन गटाच्या भूमिकेची री ओढली. मात्र बीसीसीआयमध्ये जगमोहन दालमिया आणि भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीच्या नियुक्तीनंतर डीआरएससंदर्भात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या पद्धतीमधील चांगल्या गोष्टी आणि त्रुटी याबाबत संघ सहकाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे.
‘डीआरएसबद्दल गोलंदाजांशी चर्चा करायला हवी. त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीपूर्वी फारसा वेळ नव्हता. मात्र आता या पद्धतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ आहे’ असे कोहली म्हणाला.

Story img Loader