Harshit Rana and Mitchell Starc funny video viral during Perth test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क फलंदाजी करत होता, तर भारताकडून युवा गोलंदाज हर्षित राणा त्याच्याविरुद्ध वेगवान बाउन्सरचा मारा करत होता, ज्याचा सामना करताना स्टार्कला अडचणी येत होत्या. त्यामुळे तो हर्षित राणाला काय तरी म्हणाला, जे ऐकून हर्षितला हसू आले. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मैदानावर स्टार्क आणि राणा यांच्यात काय झालं बोलणं?

खरंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षित राणा मिचेल स्टार्कला गोलंदाजी करत असताना, तो त्याला सतत वेगवान गतीने बाउन्सरचा मारा करत त्रास देत होता आणि परीक्षा घेत होता. त्यामुळे मिचेल स्टार्क ते चेंडू मागे सोडत होता. मात्र, एकदा हर्षित राणाने मिचेल स्टार्कला एक गुड लेन्थ चेंडू टाकला, जो स्टार्कच्या बॅटच्या काठाला लागून स्लीपमध्ये गेला, जिथे विराट कोहली उभा होता. मात्र, चेंडू एक टप्पा होऊन विराटच्या हातात गेला. त्यामुळे मिचेल स्टार्क झेलबाद होऊ शकला नाही. यावेळी मिचेल स्टार्कने हर्षित राणाची मस्करी केली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यानंतर जेव्हा राणा पुन्हा गोलंदाजी करायला जात होता, तेव्हा स्टार्क त्याला म्हणाला, ‘हर्षित, मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो आणि माझी स्मरणशक्ती जास्त आहे’. यावर प्रत्युत्तर म्हणून भारताचा युवा गोलंदाजाने त्याच्याकडे पाहिले आणि हलकी स्माइल दिली. मिचेल स्टार्क आपल्या वेगवान गोलंदाजी आणि बाउन्सरने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांनाही त्रास देतो. त्यामुळे राणाने पण स्टार्कविरुद्धही असेच रणनीती अवलंबली.

हेही वाचा – Hazrat Bilal No Ball : क्रिकेटच्या इतिहासात यापेक्षा मोठा ‘नो बॉल’ कधीच पाहिला नसेल, फाफ डू प्लेसिसही झाला चकित ; VIDEO व्हायरल

u

हर्षित आणि स्टार्क आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत –

हर्षित राणा आणि मिचेल स्टार्क आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून एकत्र खेळत होते. यादरम्यान मिचेल स्टार्कने वेगवान गोलंदाजीतील अनेक बारकाव्यांबद्दल हर्षित राणाला मार्गदर्शन केले आहे. हे दोघेही केकेआरच्या गोलंदाजीचे महत्त्वाचे भाग होते. एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून स्टार्कने त्या काळात हर्षितला मार्गदर्शन केले असेल. आयपीएलच्या मागील हंगामात हर्षित राणाने १३ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या होत्या. तर मिचेल स्टार्कने १४ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या.