R Ashwin statement on Retirement : टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवृत्तीबाबत पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. आर अश्विनने सांगितले की तो आणखी खेळू शकला असता, परंतु त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्याने निवृत्ती का घेतली नाही, हे लोकांनी विचारावे असे त्याला वाटत नव्हते. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. तो दुसरा कसोटी सामना खेळला आणि तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला. पहिल्या कसोटी सामन्यातही त्याला स्थान मिळू शकले नव्हते.

अश्विन निवृत्तीच्या निर्णयावर काय म्हणाला?

आता रविचंद्रन अश्विनने स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर निवृत्तीबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “माझ्यात आणखी क्रिकेट खेळण्याची क्षमता होती. त्यामुळे आणखी क्रिकेट खेळू शकलो असतो. पण लोकांनी तुम्हाला का निवृत्ती घेतली नाही असे विचारण्याऐवजी का निवृत्ती घेतली, अशी स्थिती असताना निवृत्ती घेतलेली कधीही बरी.” अश्विनने असेही सांगितले की तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफबद्दल जास्त बोलत नाही. कारण काही काळापूर्वी तो स्वतः त्या संघाचा भाग होता. अशा परिस्थितीत त्याला आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल कमी करायचे नव्हते.

अश्विन पुढे म्हणाला, “मला आणखी क्रिकेट खेळायचे आहे. जागा कुठे आहे? अर्थातच भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नाही पण कुठेतरी मला खेळाप्रती प्रामाणिक राहायचे आहे. कल्पना करा की मला फेअरवेल टेस्ट खेळायची आहे पण मी खेळण्याच्या पात्रतेचा नाही. संघ, म्हणून मी स्वत: ला घेऊ इच्छित नाही आणि मी त्यास पात्र नाही आणि ही माझी फेअरवेल कसोटी आहे म्हणून मला संधी मिळाली तर मी स्वतः ती स्वीकारणार नाही.’

हेही वाचा – Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

अश्विन आयपीएलमध्ये खेळताना दिसणार –

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो अजूनही आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच सीएसकेने त्याला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. याशिवाय तो क्लब क्रिकेटही खेळू शकतो. मात्र, जोपर्यंत तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत तो रिटायर्ड प्लेअर्स लीगमध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत तो कोणत्या स्थितीत आहेत हे आयपीएल २०२५ च्या कामगिरीनंतर दिसेल. त्याचा फॉर्म चांगला राहिल्यास चेन्नई सुपर किंग्ज त्याला पुढील हंगामातही कायम ठेवेल. जर तो चांगला खेळला नाही तर त्याला सोडले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर

अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज –

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन सातव्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर १०६ कसोटीत ५३७ विकेट्स आहेत. ५९ धावांत सात विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या काळात त्याची सरासरी २४.०० होती आणि स्ट्राइक रेट ५०.७३ होता. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ६१९ कसोटी विकेट्स आहेत.

Story img Loader