भारतीय संघात आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळवणारा खेळाडू म्हणजे मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांत स्थान देण्यात आले आहे. यावर ईश्वरने मी आशाच कधीच सोडली नाही. मेहनत घेत राहीलो आणि मला नक्की संधी मिळणार असा विश्वास होता असे म्हटले आहे.
नव्या वर्षाची सुरुवात ईश्वर पांडेसाठी करिअरच्या दृष्टीकोनातून सकारात्मक दिशेने झाली आहे. संघात स्थान मिळाले पण, चांगली कामगिरी करणे हे माझे लक्ष्य आहे. मिळालेल्या संधीच चीज करीन असेही ईश्वर पांडे म्हणाला.
ईश्वर पांडेला संघात स्थान मिळण्याची दोन कारणे-
१. २०१२-१३ वर्षात रणजी क्रिकेटमध्ये ईश्वर पांडेच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. ईश्वरने २१.०६च्या सरासरीने ४८ विकेट्स मिळविल्या आहेत. यावेळीच्या रणजी सामन्यांमध्येही ईश्वरची कामगिरी समाधानकारक ठरणारी राहीली आहे.  
२. ईश्वर पांडेच्या गोलंदाजीला उत्तम उसळीही आहे. मध्यम गती गोलंदाजीने सरासरी १३० च्या गतीने ईश्वर गोलंदाजी करू शकतो. ८४ धावांवर ८ विकेट्सही त्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे. युवा गोलंदाज आणि पहिल्या संधीच्या प्रतिक्षेत असल्याने आंतराष्ट्रीय स्तरावर ईश्वरला संधी देऊन त्याच्या आत्मविश्वासात वाढ होईल म्हणूनही ईश्वरचा संघात समावेश करण्यात आला आहे.