इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या हंगामात स्वत:साठी कोणत्याही प्रकारचे लक्ष्य निश्चित करायला मला आवडणार नाही. परंतु मुंबईच्या क्रिकेटरसिकांसाठी प्रथमच आयपीएल जेतेपद जिंकून देण्याचा माझा निर्धार आहे, असे मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने सांगितले.
‘‘मला स्वत:साठी लक्ष्य निश्चित करायला आवडत नाही. मी एखाद्या प्रसंगी काही लक्ष्य आखले तरी स्वत:पुरते मर्यादित ठेवतो. मी थोडा अंधश्रद्धाळू आहे,’’ असे सचिन म्हणाला.
‘‘सर्वानाच अभिप्रेत आहे की, संघाने आयपीएल जिंकावे. मुंबई इंडियन्सच्या सर्वच चाहत्यांना तो अनमोल नजराणा ठरेल. माझी ती खूप इच्छा आहे. आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी बजावू आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करू, बाकी सारे ईश्वरावर सोडू,’’ असे सचिन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली यंदा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलसाठी सज्ज होत आहे.

Story img Loader