क्रिकेटविश्वातील आख्यायिका म्हणून ओळखला जाणा-या सचिन तेंडूलकरच्या निवृत्तीचा क्षण त्याच्या अनेक चाहत्यांसाठी दु:खद क्षण ठरला होता. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, कलाकार सचिनच्या फलंदाजीचे निस्सीम चाहते आहेत. मात्र, टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोव्हाने सचिन तेंडूलकर नावाची व्यक्तीच आपल्याला माहित नसल्याचे सांगून अनेकांना धक्का दिला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर टेनिसचा चाहता असून, सचिन अनेकदा टेनिस सामन्यांचा आनंद मैदानावर प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहून लुटत असतो. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतील एका सामन्यासाठी इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम याच्यासह सचिन तेंडुलकर मैदानावरील रॉयल बॉक्समध्ये उपस्थित होता. सामन्यानंतरच्या पत्रकारपरिषदेत मारिया शारापोव्हाला या प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीबद्दल विचारण्यात आले असता, मला त्यावेळी डेव्हिड बेकहॅम सोडून रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असणाऱ्या अन्य व्यक्तींबद्दल माहिती नसल्याचे शारापोव्हाने सांगितले. त्यावेळी सचिनबद्दल शारापोव्हाला आठवण करून दिल्यानंतर, सचिन तेंडुलकर हे नावच आपण कधी ऐकले नसल्याचे मारियाने सांगितल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा