Rishabh Pant’s Reaction on Rahul Goenka Controversy : आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात पराभव झाला होता. यानंतर एलएसजी संघाचा कर्णधार केएल राहुल आणि मालक संजीव गोयंका यांच्यातील वादाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. या वादाच्या व्हिडीओवर आता भारतीय भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादने लखनऊला १० विकेट्सनी पराभूत केल्यानंतर एलएसजी संघाचे मालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर संतापले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत राहुलवर राग व्यक्त करताना गोयंका स्पष्टपणे नाराज दिसत होते.
एलएसजीचे प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाले होते की, गोयंका हे त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या सर्वात शांत लोकांपैकी एक आहेत. कारण प्रत्येक सामन्यानंतर जे स्वाभाविक संभाषण केले जाते, तेच हे होते. या घटनेवर भाष्य करताना पंत म्हणाला की जेव्हा जेव्हा संघ हरतो तेव्हा त्याच्यावर स्वाभाविक चर्चा होणे खूप सामान्य आहे, परंतु केएल राहुलच्या प्रकरणात काय झाले होते. हे त्याला माहित नव्हते. ऋषभ पंतने कबूल केले की तो देखील बऱ्याच अशा प्रसंगातून गेला असून त्याला पण ऐकून घ्याव लागले आहे. मात्र ऋषभ म्हणाला, हे तो त्याच्या पद्धतीने हाताळतो.
ऋषभ पंत राहुल-गोयंका वादावर काय म्हणाला?
ऋषभ पंत इंडिया टीव्हीवरील ‘आप की अदालत’च्या एका एपिसोडमध्ये म्हणाले की, “त्या परिस्थितीत नक्की काय घडले होते, ते मला खरचं समजले नाही. जेव्हा तुम्ही सामना गमावता तेव्हा साहजिकच अनेक गोष्टी घडतात. पण ज्या पद्धतीने ते सादर केले गेले, मला त्याची खात्री नाही. मी रिअल टाइममध्ये व्हिडीओ पाहिला नाही. अन्यथा, मी तुम्हाला उत्तर दिले असते. मलाही अनेकदा ओरडा सहन करावा लागतो, परंतु मी देखील खूप हट्टी आहे.”
हेही वाचा – आता काय बाकीच्या १० खेळाडूंच्याही जागी मीच खेळू का? आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमचे वक्तव्य
प्रशिक्षक आणि कर्णधार संघ चालवतात –
या वादावर प्रतिक्रिया देताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, “संघ मालकाची भूमिका अशी असली पाहिजे की, जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये किंवा पत्रकार परिषदेदरम्यान खेळाडूंना भेटतो, तेव्हा त्याने केवळ प्रेरणादायक गोष्टी बोलल्या पाहिजेत. पण जर मालक आला आणि म्हणाला काय चालले आहे? काय अडचण आहे? किंवा जर त्याने व्यवस्थापनातील एखाद्याला पकडले आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूबद्दल प्रश्न उपस्थित करणे सुरू केले, तर ते योग्य नाही. पहा, प्रशिक्षक आणि कर्णधार संघ चालवतात. त्यामुळे या मालकांनी खेळाडूंशी पंगा न घेणे, न रागावणे हेच त्यांच्यासाठी बरे राहिल.”