Kavem Hodge says Mark Wood I have a wife and kids at home : मार्क वुडने शुक्रवारी ट्रेंट ब्रिज येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मायदेशात इंग्लंडच्या गोलंदाजाने सर्वात वेगवान कसोटी षटक टाकून इतिहास रचला. मात्र, असे असतानाही केव्हम हॉज आणि ॲलेक अथानाजे यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या १७५ धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने पाच गडी गमावून ३५१ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर केव्हिन हॉजने मार्क वूडच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना त्याच्याशी केलेल्या मस्करीचा किस्सा सांगितला.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिज आता इंग्लंडपेक्षा फक्त ६५ धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या होत्या. केव्हम हॉजने १७१ चेंडूंचा सामना करताना १९ चौकारांच्या मदतीने १२० धावा केल्या. अलिकने ९९ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि एक षटकार मारत ८२ धावांचे योगदान दिले.

Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Gus Atkinson Hattrick in Test First Bowler At Basin Reserve in New Zealand vs England Test
Gus Atkinson Hattrick: कसोटी हॅटट्रिक! गस अ‍ॅटकिन्सनने वेलिंग्टनमध्ये घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
KL Rahul and Kane Williamson Both Survives on No Ball After Getting Out in IND vs AUS & ENG vs NZ Test
नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO

मार्क वूडच्या वेगवान बॉलिंगने ओकली आग –

नुकताच निवृत्त झालेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या जागी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्क वूड सामील झाला आहे. ज्याने आपल्या पहिल्याच षटकातील वेगवान माऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने पहिलाच चेंडू ताशी १५१.१ किमी वेगाने टाकला. यानंतर दुसरा चेंडू १५४.६५, तिसरा १५२.८८, चौथा १४८.०६ , पाचवा ताशी १५५.३० वेगाने आणि शेवटचा चेंडू वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला ताशी १५३.२० किमी वेगाने टाकण्यात. अशा प्रकारे मार्क वूडने ताशी १५१.९२ किमी वेगाने षटक टाकले, ज्यामुळे सर्वजण चकीत झाले. यावर आता केव्हिन हॉजने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Mohammad Shami : दोघांनाही माझ्या बॉलिंगवर खेळायला आवडत नाही; मोहम्मद शमीचा विराट-रोहितबद्दल खुलासा, VIDEO व्हायरल

केव्हिन हॉज मार्क वूडला काय म्हणाला?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर केव्हिन हॉज मार्क वूडशी केलेल्या मस्करीबद्दल म्हणाला, “आजचा दिवस खूप क्रूर होता. तुम्ही प्रत्येक दिवशी कमाल करु शकत नाही. विशेषता मार्क वूडसारख्या वेगवान गोलंदाजा सामना करताना. कारण तो प्रत्येक चेंडू ताशी ९० किमी वेगाने टाकत होता. एक वेळ अशी आली, जेव्हा मी त्याच्याशी मस्करी करताना म्हणालो, अरे भावा, जरा बेताने घरी बायका मुलं आहेत. पण शतकानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला. कसोटी क्रिकेट क्रूर आहे, कारण ते मानसिकदृष्ट्या थकवणारे आहे. ज्यामध्ये मार्क वुड सारख्या गोलंदाजांचा सामना करणे कठीण होते, परंतु ते समाधानकारक होते.”

हेही वाचा – IND vs SL : ‘प्रत्येकाचे नशीब शुबमन गिलसारखे…’, ऋतुराज गायकवाडला संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला

केव्हिन हॉजने झळकावले दमदार शतक –

मार्क वुडच्या वेगवान चेंडूंचा कॅरेबियन खेळाडूंवर फारसा प्रभाव पडला नाही. फिरकीपटू शोएब बशीरने इंग्लिश संघाला यश मिळवून दिले. सलामीवीर मायकेल लुईसशिवाय त्याने कर्क मॅकेन्झीलाही आपला शिकार बनवले. इंग्लिश संघाकडून ॲटकिन्सन, ख्रिस वोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. तर, वेस्ट इंडिजकडून हॉजने शतक आणि अलिक अथनाजेने अर्धशतक झळकावले. कर्णधार क्रेग ब्रॅथवेट ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत जेसन होल्डर २३ आणि जोशुआ डी सिल्वा ३२ धावांसह क्रीजवर उपस्थित होते.

Story img Loader