नवी दिल्ली : आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना गोलरक्षकाच्या कामगिरीची दखल घेतली जात नसल्याबद्दल खेद व्यक्त करताना आजपर्यंतच्या अनुभवाने खूप काही शिकवले, असे भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने सांगितले.‘‘गोलरक्षण ही जबाबदारी खूप कठीण आहे. एखाद्या सामन्यात मी जर प्रतिस्पर्ध्यांचे दहा प्रयत्न हाणून पाडले आणि एक गोल स्वीकारला, तर त्या एका चुकीची चर्चा अधिक होते. मी वाचवलेले दहा गोल दिसत नाहीत. अर्थात, हा सर्व कारकीर्दीचा एक भाग झाला. हे सत्य स्वीकारून मी पुढे जात राहिलो. अनुभवाने हळू हळू माझ्यातील नकारात्मक विचारांवर मात केली आणि अशा विषयांपासून दूर रहायला शिकवले,’’असे श्रीजेश म्हणाला.

हेही वाचा >>> Usman Tariq : पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ बॉलिंग ॲक्शनमुळे चर्चेत, VIDEO व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी घेतला आक्षेप

व्हॉलीबॉल लीगच्या माध्यमातून व्हॉलीबॉलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अमेरिकेचा डेव्हिड ली याच्याशी खेळाडूंची मानसिकता या विषयावरील चर्चेत संवाद साधताना श्रीजेशने मेहनत आणि अनुभवाचे महत्त्व सांगितले. ‘‘ गोलरक्षण हा पूर्णपणे मानसिक खेळ आहे. एक खेळाडू म्हणून आम्हाला सामन्यात सहभागी व्हायचे असते. प्रत्यक्ष सामन्यात आम्ही फक्त मागे उभे नसतो, तर समोर चाललेल्या खेळाचा विचार आमच्या डोक्यात सुरू असते,’’ असे श्रीजेश म्हणाला.

हेही वाचा >>> Ranji Trophy : मुंबईने तामिळनाडूला १४६ तर एमपीने विदर्भाला डाव १७० धावांत गुंडाळले, पहिल्या दिवशी तुषार-आवेश प्रभावी

तरुणपणी नकारात्मक भावना माझ्यातील सकारात्मक भावनांवर वर्चस्व गाजवायच्या. त्यामुळे मी अनेकदा गोल स्वीकारले. आता अनुभवाने खूप गोष्टी बदलल्या आहेत. मी सकारात्मक गोष्टींना वर्चस्व मिळवून देतो, असे सांगून श्रीजेशने लीगच्या माध्यमातून व्हॉलीबॉल खेळाडूंना सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या वेळी श्रीजेशने हॉकी इंडिया लीगमध्ये खेळण्याचा अनुभव सांगितला.‘‘परदेशातील खेळाडू कसे खेळतात आणि ते कसे प्रशिक्षण घेतात, सहकारी खेळाडूंना कसे मार्गदर्शन करतात आणि कसे वागतात हे मला जवळून अनुभवयाला मिळाले. त्यामुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडला,’’असे श्रीजेश म्हणाला.

हॉकीने मला वैयक्तिक जीवनात दबाव आणि टीकेला कसे सामोरे जावे हे शिकवले. त्यामुळेच मैदानाबाहेरही मी यशस्वी होऊ शकलो.

पीआर श्रीजेशभारताचा गोलरक्षक

Story img Loader