आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी केलेले सर्व आरोप भारतीय संघाचा अष्टपैलू सुरेश रैनाने फेटाळून लावले आहेत. क्रिकेट हे माझ्यासाठी सर्वस्व असून माझा कोणत्याही चुकीच्या कृत्यात सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण रैनाने दिले आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोपात कोणतेही तथ्य नाही. मी नेहमी अत्यंत प्रमाणिकपणे खेळत आलो आहे आणि पुढेही खेळत राहीन. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरून ललित मोदींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत माहिती घेत असल्याचेही रैनाने यावेळी सांगितले.
दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱया सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मुंबईस्थित बड्या उद्योगपतीकडून प्रत्येकी २० कोटी रुपयांची लाच घेतली होती, असा खळबळजनक आरोप ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. बीसीसीआयने यापूर्वीच या प्रकरणाबाबत रैना, जडेजाला क्लिन चीट दिली आहे.

Story img Loader