टीम इंडियाचा स्टार आणि स्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव सतत चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या शॉट मारण्याच्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. सूर्यकुमार यादवला मिस्टर 360 असे म्हटले जाते. तो चारही दिशेला फटकेबाजी करतो. त्याला आयसीसीकडून २०२२ चा टी-२० प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने त्याचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमार यादवची शॉट्स खेळण्याची पद्धत उत्कृष्ट – पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीच्या रिव्ह्यूत सूर्यकुमार यादवबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये तो म्हणाला की, ”आम्ही अनेक खेळाडूंना 360 डिग्री शॉट्स मारताना पाहिले आहे, पण सूर्याचे काही शॉट्स खूपच उत्कृष्ट आहेत. तो ज्या पद्धतीने यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू लगावतो ते उत्कृष्ट आहे. तो अनेक लोकांपेक्षा चांगल्या पद्धतीने लगावतो.”

या फॉरमॅटमधला सूर्या हा सर्वोत्तम खेळाडू आहे – पाँटिंग

दुसरीकडे पाँटिंग म्हणाला की, ”इनोवेशन आणि स्किलनुसार या फॉरमॅटमध्ये मी त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही. तो जे करतो आहे, ते करण्याचा प्रयत्न आणखी खेळाडू करतील आणि हे फॉरमॅट पुढे जाईल.” रिकी पाँटिंगनेही सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल सांगितले. तो म्हणाला, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंसोबत खेळल्यानंतर तो आता त्याच्या सर्वात फिट रुपात आहे.

आजपासून भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळला जाईल. या मालिकेत उपकर्णधार पदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असेल. या सामन्याला संध्याकाळी सातला जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे सुरुवात होईल.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गांगुलीचा कोहलीला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याला कसोटी क्रिकेटमध्ये…’

संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव

संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I have never seen a better player than him ricky ponting becomes suryakumar yadav fan vbm