प्राणघातक हल्ल्याचा शिकार ठरलेला न्यूझीलंड संघाचा फलंदाज जेसी रायडर न्यूझीलंडच्या आंतराष्ट्रीय संघात पुढच्या आठवड्यात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
डोपींग प्रकराणामुळे ओढावलेली सहा महिन्यांची बंदी आणि झालेला प्राणघातक हल्ला या गोष्टींना मागे सारून पुन्हा नव्या जोमाने मला खेळता येणार आहे याचाच आनंद असल्याचे रायडरने स्पष्ट केले. तसेच “जेव्हा मी माझ्या भूतकाळावर नजर टाकतो तेव्हा, आता मी जिवंत आहे हेच माझे नशीब” असेही रायडर म्हणाला.
ख्रिस्टचर्चमधील एका बारमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडर जबर जखमी झाला होता. तसेच वजन कमी करण्यासाठी सेवन केलेल्या अयोग्य औषधांमुळे रायडर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. या दुहेरी संकटावर मात करून रायडर संघात पुनरामन करत आहे. यावर रायडर म्हणाला, उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याच्या प्रकरणावरून माझे क्रिकेट करिअर संपुष्टात येण्याची भीती होती. तसेच ख्रिस्टचर्चमधील घटनेने तर, माझ्या करिअरला पूर्णविरामच मिळाला असता. यासर्वातून मी बचावलो हीच मोठी गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा