Jasprit Bumrah: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेला शुक्रवारपासून (१८ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मालिकेत तीन टी२० सामने खेळणार आहे. बुमराह दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०२२ मध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२०मध्ये त्याने चार षटकांत ५० धावा दिल्या होत्या. हा त्याचा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात महागडा स्पेल होता. बुमराह वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, यापूर्वी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझं करिअर संपलं असं मला एकदाही वाटून गेलं नाही- जसप्रीत बुमराह

आयर्लंडविरुद्धच्या भारताच्या पहिल्या टी२० सामन्याच्या एक दिवस अगोदर बुमराह म्हणाला, “जेव्हा दुखापत बरी होण्यास वेळ लागतो तेव्हा तो काळ हा खूप निराशाजनक असतो. मी स्वतःवर शंका घेण्याऐवजी तंदुरुस्त कसे व्हावे आणि पुनरागमन कसे करावे याचा विचार अधिक करत होतो. विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण १० षटके टाकण्यासाठी शरीराला वेळ आणि आराम देणे महत्त्वाचे होते. मी याला कधीही वाईट टप्पा म्हणून घेतले नाही. माझं करिअर संपलं असं मला एकदाही वाटलं नाही. मी या सर्व काळात माझ्या परिस्थितीवर उपाय शोधत होतो आणि जेव्हा उपाय सुचला तेव्हा माझ्या डोक्यातील विचार कमी झाले.”

वेगवान गोलंदाज जसप्रीत पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुखापतीचा सामना करत असता, तेव्हा तुम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता, जग काय म्हणत याकडे फारसे लक्ष मी दिले नाही. मला त्यातून लवकरात लवकर सावरायचे होते. यातून तुम्ही खेळाचा अधिक आनंद घ्यायचा कसा, हे शिकतात. मी याकडे माझ्या आयुष्यातील वाईट काळ असे म्हणून पाहिले. तो काळ कुठल्या ना कुठल्या रुपात तुमच्यासमोर येतोच मात्र, त्याला तुम्ही कसे तोंड देता हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. त्याकाळात मला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. मी याकडे सकारात्मकतेने पाहिले. मी क्रिकेटपासून दूर राहिलो त्यावेळी माझ्या कुटुंबाने खूप सहकार्य केले. सहकाऱ्यांशी संवाद साधल्याने मला प्रेरणा मिळाली.”

हेही वाचा: Arjun Tendulkar: ‘ही दोस्ती तुटायची…’, जखमी पृथ्वी शॉला धीर देण्यासाठी आला बालपणीचा मित्र अर्जुन तेंडुलकर

बुमराह पुढे म्हणाला की, “दुखापत बरी होण्यासाठी वेळ लागतो. मी एनसीएमध्ये अनेक खेळाडूंना भेटलो. काहीवेळा आयुष्यात घटणाऱ्या घटना तुमच्या नियंत्रणात नसतात. शरीराला सावरण्यासाठी वेळ लागतो आणि शरीराचा आदर करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा तुम्हाला तीच खेळाप्रती काहीतरी चांगले करण्याची भूक असणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळता तेव्हा ऑफ-सीझन कसा असतो हे माहित नसते. या टप्प्यावर, माझ्या शारीरिक समस्या संपेपर्यंत, मला माझ्या फिटनेस आणि गोलंदाजीवर काम करायचे होते. संघाची कामगिरी कशी आहे हे मी पाहत होतो आणि खेळाडूंना भेटणे त्यांच्याशी बोलत राहणे यातून लवकर बरा झालो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I never once felt like my career was over jasprit bumrahs big statement ahead of his return to international cricket avw