Gautam Gambhir’s Statement on Cricketer: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे. तो म्हणाला की, “त्याला क्रिकेटर व्हायचं नव्हतं.” गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याच्या कारकिर्दीत भारताचा महत्त्वाचा भाग होता आणि अजूनही आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत. गंभीरने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतासाठी मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. गंभीरची खेळी क्रिकेट चाहते कधीच विसणार नाही. नेमकं असं काय झालं? ज्यामुळे तो असे विधान करत आहे, जाणून घेऊ या.

माजी क्रिकेटपटू असण्याबरोबरच तो एक गोतम गंभीर खासदार देखील आहे. गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. तो अनेकदा इतर खेळाडूंबद्दल प्रतिक्रिया देत असतो. त्याचवेळी, गंभीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो की, “मला क्रिकेटर क्रिकेटर व्हायचचं नव्हतं.” त्याने क्रिकेट नसता काय झाला असता याबद्दल भाष्य केलं आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

‘बडा भारत टॉक शो’मध्ये गोतम गंभीरला विचारण्यात आले होते की, “तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख काय आहे?” यावर माजी सलामीवीर गंभीरने आश्चर्यकारक असे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी क्रिकेटर व्हायला नको होते. मला कधीच क्रिकेट व्हायचं नव्हतं.” मात्र, गंभीरने असे वक्तव्य का केले याचा खुलासा केलेला नाही.

हेही वाचा: IND vs NEP: विराट कोहलीला मेडलच्या बदल्यात आसिफ शेखकडून हवे मेडल! सामन्यानंतरचा ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

अशी आहे गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द

गौतम गंभीर २००३ ते २०१६ या काळात भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या १०४ डावांमध्ये त्याने ४१.९५च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या ज्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या १४३ डावांमध्ये त्याने ३९.६८च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ११ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली.

आंतरराष्ट्रीय टी२०च्या ३६ डावांमध्ये त्याने २७.४१च्या सरासरीने आणि ११९.०२च्या स्ट्राईक रेटने ९३२ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ७ अर्धशतके केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त गंभीरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५४ सामने खेळले. आयपीएलच्या १५२ डावांमध्ये त्याने ३१.०१च्या सरासरीने आणि १२३.९१च्या स्ट्राइक रेटने ४२१८ धावा ठोकल्या, ज्यामध्ये त्याने एकूण ३६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपदही भूषवले आणि संघाला दोनदा विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली.

हेही वाचा: Shahid Afridi: “पाकिस्तान सुरक्षित!”, शाहिद आफ्रिदीची जय शाहांवर टीका; म्हणाला, “तुमच्या डोक्यातील विचारांची जळमटं…”

गौतमने शुबमन गिल, तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. गंभीरला नजीकच्या भविष्यात सुपरस्टार बनण्याची क्षमता असलेल्या युवा क्रिकेटपटूचे नाव विचारले असता, त्याने अनुभवी लेगस्पिनर रवी बिश्नोईची निवड केली.

Story img Loader