बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या स्टीव्ह स्मिथला आपल्या, आयपीएलच्या कर्णधारपदाचाही राजीनामा द्यावा लागला. दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने अकराव्या हंगामासाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. मात्र या सर्व घटनांनंतर एक खेळाडू म्हणून स्टीव्ह स्मिथबद्दल मला आदर वाटत असल्याचं, अजिंक्य रहाणेने स्पष्ट केलं आहे. जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तो बोलत होता.

अवश्य वाचा – शिक्षा सुनावल्यानंतर आफ्रिकन कर्णधार फाफ डु प्लेसिसचा स्टीव्ह स्मिथला मेसेज, वाचा काय म्हणाला डु प्लेसिस!!

“जे काही घडायचं होतं ते घडून गेलं आहे. ती घटना आठवून गोष्टी आता बदलणार नाहीयेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने स्मिथवर केलेली कारवाई योग्य की अयोग्य हे बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. मात्र क्रिकेटमध्ये खेळाडूने केलेल्या कामगिरीचा आदर नक्कीच व्हायला हवा. एक खेळाडू आणि फलंदाज म्हणून स्टीव्ह स्मिथबद्दल मला अजुनही आदर वाटतो”, पत्रकारांशी बोलताना अजिंक्य रहाणेने बॉल टॅम्परिंग प्रकरणावर आपली बाजू मांडली.

अवश्य वाचा – स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला २०१६ मध्येही मिळाली होती ताकीद – रिपोर्ट

स्मिथच्या ऐवजी राजस्थान संघाने दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिच क्लासेनला संघात जागा दिली आहे. मात्र संघात स्टीव्ह स्मिथची उणीव कायम भासत राहील असं अजिंक्य म्हणाला. राजस्थानचं कर्णधारपद ही स्टीव्हच्या अनुपस्थितीत आपल्या खांद्यावरची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचंही अजिंक्यने स्पष्ट केलं. याचसोबत कर्णधारपदासाठी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकल्याबद्दल अजिंक्यने राजस्थान संघ प्रशासनाचे आभार मानले.

अवश्य वाचा – माझ्या कृत्याने आई-वडिलांना नाहक त्रास, पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला रडू अनावर

Story img Loader