India vs West Indies 100th Test Match: भारताचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अलीकडच्या काळातील सद्य स्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात क्वीन्स पार्क येथे २० जुलैपासून होणारी दुसरी कसोटी ऐतिहासिक असेल. दोन्ही संघांमधील हा १०० वा कसोटी सामना असणार आहे. या खास सोहळ्यापूर्वी मीडियाशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांच्या क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे, त्यावेळी माझा जन्मही झाला नसावा, त्याकालपासून या दोन्ही संघांचे क्रिकेट सुरू आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजच्या आताच्या काळातील सद्य परिस्थितीवर रोहितचे वक्तव्य खूप महत्वाचे आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या परिस्थितीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “बघा संघात काय समस्या आहे, मी ते सांगू शकत नाही. एक फॅन म्हणून जोपर्यंत मला आतून कळत नाही तोपर्यंत मी सांगू शकणार नाही की खरी समस्या काय आहे?” रोहित शर्मा म्हणाला की, “मी माझ्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजच्या ज्या खेळाडूंसोबत खेळलो त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. पहिल्या कसोटीतही त्यांच्याकडे जर अनुभवी फिरकीपटू असते तर ते आमच्यासाठी अडचणीचे ठरू शकले असते.”

निवृत्तीनंतर मला आतली गोष्ट जाणून घ्यायची आहे –  रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जेव्हाही आम्ही वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतो तेव्हा या टीममध्ये काय चाललंय याचा विचार करून खेळत नाही? आम्ही एक संघ म्हणून इथून काय घेऊन जाऊ शकतो हे पाहत असतो.” रोहित पुढे म्हणाला की, “मी येथे केलेल्या मागील ६-७ दौऱ्यांमध्ये काय केले? आणि  या दौऱ्यातून मी माझ्या संघासाठी काय काय घेऊन जाऊ शकतो यावर लक्ष केंद्रित केले आहे. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत माझे लक्ष याविषयावरच असेल. मी निवृत्त झाल्यावर त्यांच्या संघाची अशी अवस्था का झाली याचा शोध हेईन.”

पत्रकार परिषदेत रोहित शर्माला या ऐतिहासिक कसोटीतील कर्णधारपदाबद्दल विचारले असता, त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले. रोहित म्हणाला, “हा खूप मोठा क्षण आहे. दोन्ही देशांदरम्यान १००वी कसोटी होणार आहे. दोन्ही देशांचा क्रिकेटचा इतिहास मोठा आहे. मी जन्मालाही आलो नव्हतो तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. दोन्ही संघ चांगले क्रिकेट खेळले आहेत. मला आशा आहे की १००वी कसोटी देखील अशीच असेल.” मात्र, रोहितलाही एका गोष्टीची काळजी वाटत होती. जी त्याने पत्रकार परिषदेत सांगितली.

हेही वाचा: IND vs WI: “मला असं वाटत की त्याने आक्रमक…”, रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत इशानला संधी देणार? जाणून घ्या

वास्तविक, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत हवामानामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार्‍या १००व्या कसोटी सामन्यात अडथळा येऊ शकतो. या कसोटी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. आता याचा सामन्यावर कितपत परिणाम होईल हे माहीत नाही, पण १००व्या कसोटी सामन्याबाबत जे वातावरण निर्माण झाले आहे त्याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो. कारण हा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने जोरदार तयारी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी नोव्हेंबर १९४८ मध्ये खेळली गेली. दिल्लीतील हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was not even born why did rohit say this before the 100th test against west indies a fear haunt avw