नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकलो, तेव्हा संघातील तरुण सहकाऱ्यांच्या यशस्वी पदार्पणातील आनंदात हरवून गेलो होते, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘विराट कोहलीसह काही मोठ्या खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताकडून पाच क्रिकेटपटूंनी कसोटी पदार्पण केले. या सर्वांबरोबर खेळायला मला खूप आवडले. या प्रत्येकाची क्षमता काय आहे याची मला कल्पना होती. वरिष्ठ संघाकडून खेळण्यापूर्वी त्यांनी काय चांगली कामगिरी केली आहे, याची मी फक्त त्यांना आठवण करून दिली. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकप्रकारची सकारात्मकता आली आणि त्यांनी माझ्या हाकेला योग्य साद दिली,’’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा…IPL च्या यशामुळे जगभरात सुरू झालेल्या ट्वेंटी-२० लीग तुम्हाला माहित आहेत का?

‘‘विजयानंतर आनंद व्यक्त करताना या सर्व तरुण खेळाडूंचे पालकही तेथे आले होते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना होत्या. त्यामुळेच त्यांचे पदार्पण आणि मालिकेत मिळविलेल्या त्यांच्या यशाचा आनंद पाहून मी भारावून गेलो. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता,’’असेही रोहितने सांगितले.

हेही वाचा…IPL 2024: रोहित-हार्दिकची गळाभेट फक्त व्हिडिओपुरतीच? MI च्या व्हिडिओवरील चाहत्यांच्या कमेंट्सने वेधलं लक्ष

सर्फराजविषयी बोलताना रोहित म्हणाला,‘‘माझ्या तरुण वयात मी सर्फराजच्या वडिलांबरोबर क्रिकेट खेळलो आहे. ते आक्रमक फलंदाजी करायचे. मुंबई क्रिकेट वर्तुळात त्यांना ओळख होती. त्यांचा मुलगा आता माझ्या कर्णधारपदाखाली भारतीय संघातून खेळताना पाहताना मलाच आनंद झाला. सर्फराज मला मुलासारखाच आहे, इतकेच मी त्याच्या वडिलांना म्हणालो.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was overwhelmed by the young debutants joy and their first series win celebration said rohit sharma psg