आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलावाची तयारी आता सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी सर्व संघमालकांना आपल्या पसंतीच्या खेळाडूंना कायम राखण्याची मूभा देण्यात आली होती. यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबसंघाने युवराज सिंह तर दिल्ली डेअरडेविल्स संघाने गौतम गंभीरला करारमुक्त केलं. भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख संदिप पाटील यांनी दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत एक मोठं विधान केलं आहे. “मी एखाद्या आयपीएल संघाचा मालक असतो तर युवराज आणि गंभीरला माझ्या संघात घेतलंच नसतं.” पाटील The Quint ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“एकेकाळच्या सर्वोत्तम खेळाडूंना आयपीएलमध्ये संघमालक करारमुक्त करत आहेत ही गोष्ट ऐकायला फारशी चांगली वाटत नाही. मात्र यामध्ये मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. युवराज आणि गौतम हे दोन्ही माझे आवडते खेळाडू आहेत, मात्र मी एखाद्या संघाचा मालक असतो तर मी देखील दोघांना संघात जागा दिली नसती.” पाटील यांनी आपलं मत मांडलं.

6 वर्ष कोलकात्याकडून खेळल्यानंतर गौतम गंभीरने मागच्या हंगामात दिल्लीकडून खेळणं पसंत केलं. कोलकात्याकडून खेळताना गौतमच्या नावावर कर्णधार म्हणून 2 विजेतेपदंही जमा आहेत. मात्र दिल्ली डेअरडेविल्स संघात आल्यानंतर गौतमची कामगिरी चांगलीच खालावली. त्यातचं हंगामाच्या मध्ये गौतमला कर्णधारपदावरुन दूर व्हावं लागलं. दुसरीकडे युवराज सिंहला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना फलंदाजीदरम्यान फारशी चमक दाखवता आली नाही. या कारणामुळे दोघांनीह संघमालकांनी आपल्या संघात जागा दिली नाहीये.

अवश्य वाचा – IPL 2019 : युवराज पुन्हा लिलावाच्या मैदानात, किंग्ज इलेव्हन पंजाबकडून युवराज करारमुक्त