Naveed ul Hasan’s statement on Virat Kohli: विराट कोहली की बाबर आझम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजाकडे चांगले तंत्र आहे? याबाबत नेहमीच चर्चा होत असते. बाबर-कोहली मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत ही वेगळी बाब. दोघेही कठीण काळात एकमेकांना साथ देताना दिसत आहेत. तरीही दोन दिग्गज क्रिकेटपटूंची तुलना नेहमीच केली जाते. आता माजी पाकिस्तानी खेळाडू नावेद-उल-हसनने विराट कोहलीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानसाठी ११० वनडे विकेट घेणारा गोलंदाज नावेद-उल-हसन सध्या आपल्या भडक विधानांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तो म्हणाला होता की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील. त्याचबरोबर त्याने सेहवागबद्दल असेही म्हटले होते की, त्याला आऊट करणे सर्वात सोपे होते. आता नावेदने विराट कोहलीबाबत एक विधान केले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

बाबर तांत्रिकदृष्ट्या विराटपेक्षा मजबूत –

नावेद-उल-हसन म्हणाला, “जेव्हाही आपण बाबर आझम किंवा विराट कोहली यांची तुलना करतो, तेव्हा मी नेहमी म्हणतो की बाबर तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यापेक्षा बलवान आहे. त्यामुळेच त्याला फार कमी अपयश आले. कोहलीने अलीकडेच दीड वर्ष संघर्ष केला आणि जेव्हा असे खेळाडू अपयशी ठरतात तेव्हा तो बराच काळ राहतात.”

हेही वाचा – Herschel Gibbs: दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची नव्या इनिंगला सुरुवात, वयाच्या ४९ व्या वर्षी केली एंगेजमेंट, पाहा फोटो

बाबर मर्यादित शॉट्सचा चांगला वापर करतो –

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की विराटकडे बाबरपेक्षा जास्त शॉट्स आहेत, परंतु मर्यादित शॉट्स असूनही, बाबरकडे जे काही आहे त्याचा तो जास्तीत जास्त वापर करतो. माजी खेळाडू पुढे म्हणाला, “बाबर तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे, पण कोहलीकडे त्याच्यापेक्षा जास्त शॉट्स आहेत. मात्र, बाबर आपल्या मर्यादित फटक्यांचा चांगला उपयोग करतो. कोहलीला बाबरपेक्षा जास्त शॉट्स असण्याचे कारण म्हणजे भारतातील खेळपट्ट्या फलंदाजीसाठी उत्तम आहेत. तो आयपीएलमध्ये खेळतो, जिथे त्याला जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागतो.”

‘… तर कोहलीला बाद करणे सोपे झाले असते’ –

या दोघांपैकी कोहलीला आऊट करण आपल्यासाठी सोपे गेले असते, असेही नावेद म्हणाला. नावेद म्हणाला, “जर मी माझ्या जुन्या लयीत असतो, तर या दोघांपैकी कोहलीला सहज आऊट केले असते. माझ्याकडे चांगला आऊटस्विंग होता म्हणून मी त्याला स्लिपमध्ये किंवा यष्टीरक्षकाजवळ झेलबाद केले असते.”

हेही वाचा – Team India: जसप्रीत बुमराहने पुनरागमनाबद्दल चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, पाहा VIDEO

नावेद-उल-हसन कोण आहे?

नावेद-उल-हसन तो तोच गोलंदाज आहे, ज्याने एका षटकात ११ चेंडू टाकले होती. त्यापैकी तीन चेंडू नो बॉल होते. त्याचे हे षटक सेहवागविरुद्ध लांबले होते. जे त्याला संपवताना घाम सुटला होता. विशेष म्हणजे वीरेंद्र सेहवागने तीनही चेंडूत चौकार मारले होते. नावेदने या षटकात एकूण २४ धावा केल्या होत्या. या षटकातील सर्व चेंडू सेहवागने खेळले होते आणि २४ धावा केल्या होत्या. १३ मार्च २००४ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कराची येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ५ धावांनी विजय मिळवला होता.

Story img Loader