ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल असे म्हणने आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कधीही आपल्या खेळाडूंच्या हिताचे रक्षण केले नाही. तसेच डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कर्णधारपदावरील बंदीबाबत, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून अधिकाऱ्यांचा बचाव करण्याची प्रवृत्ती उघड केली. वॉर्नरने बुधवारी आपल्या कर्णधारपदावरील आजीवन बंदी उठवण्याचे अपील मागे घेतले. तो म्हणाला की, पुनरावलोकन पॅनेल त्याला सार्वजनिक पेचात पाडू इच्छित आहे. त्याचबरोबर त्याचे कुटुंब ‘क्रिकेटच्या गलिच्छ कपडे धुण्याचे वॉशिंग मशीन’ बनू इच्छित नाही.
मायकेल क्लार्कसह काही माजी खेळाडूंनी वॉर्नरला पाठिंबा दिला होता. आता चॅपेलचे नावही या यादीमध्ये जोडले गेले आहे. चॅपलने इएसपीएनक्रिकइंफो मधील आपल्या स्तंभात लिहिले आहे की, “डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कर्णधारपदावरील बंदीचे पुनरावलोकन करण्याची विनंती मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खिल्ली उडवली तेव्हा मला ते आवडले नव्हते.”
चॅपेल पुढे म्हणाले, “यावरून डेव्हिड वॉर्नरला त्याच्या हितसंबंधांबाबत अधिकाऱ्यांवर विश्वास नव्हता हे दिसून येते. वॉर्नरचा हा एक शहाणपणाचा निर्णय होता, कारण क्रिकेट ऑस्ट्रेलिया केवळ त्याच्या हिताचे रक्षण करते आणि खेळाडूंचे नाही.”
चॅपेल म्हणाले, “युवा खेळाडूंनी वॉर्नरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची केवळ स्वतःचा बचाव करण्याची प्रवृत्ती उघडकीस आणली. त्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवले पाहिजे.” तसेच ते म्हणाले,”सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वॉर्नरचे पुनरावलोकन मागे घेतल्याने त्याच्यावर आजीवन कर्णधारपदावर बंदी घालण्याचा निर्णय किती चुकीचा होता हे दिसून येते.”
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांना २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. स्मिथवर केवळ दोन वर्षांसाठी कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती, तर या प्रकरणी वॉर्नरवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर कर्णधारपदाच्या बाबतीत हीच बंदी घालायला हवी होती, असे चॅपलचे मत आहे. त्याच्या मते, स्मिथचा गुन्हा वॉर्नरपेक्षा मोठा होता. कारण तो त्यावेळी संघाचे नेतृत्व करत होता.