क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयसीसीचे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कमकुवत नेतृत्त्व कारणीभूत आहे आणि त्यांनी गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नाहीत, अशा खरमरीत शब्दांत माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी आयसीसीवर टीका केली आहे.
‘‘क्रिकेटमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काहीतरी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी क्रिकेट प्रशासकांनी सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्यापैकी बहुतांशी जण क्रिकेटशी निगडीत नाहीत. भ्रष्टाचारविरोधी गटाकडून त्यांना पकडण्यात आलेले नाही. या मंडळींना टेलिव्हिजन, वृत्तपत्रे यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे पकडण्यात आले आहे. आतापर्यंत सहज लक्ष्य होणाऱ्या छोटय़ा माशांना शिक्षा देण्याचे काम झाले आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या मूळाशी असणारे मोठे मासे, खरे दोषी मोकाट आहेत. त्यांच्यावर कोणाचाच वचक नाही,’’ असेही चॅपेल यांनी सांगितले.

Story img Loader