जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला बॅडमिंटनपटू ली चोंग वुई याने आयबीएलमधील सामन्यादरम्यान महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी भेट घेऊन चर्चा केली. ‘‘मी पहिल्यांदाच सचिनला भेटलो. सचिन माझा सामना पाहण्यासाठी उपस्थित होता, हे पाहून बरे वाटले. मी अद्याप एकही क्रिकेट सामना पाहिलेला नाही. त्यामुळे मीसुद्धा एकेदिवशी क्रिकेट सामना पाहण्यासाठी हजर असेन, अशी आशा आहे,’’ असे ली चोंग वुईने सांगितले.
मुंबई मास्टर्सच्या पहिल्या दोन लढतींना मुकलेल्या ली चोंग वुईने दिल्ली स्मॅशर्सच्या डॅरेन लिऊवर सहज विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मिश्र दुहेरीत उतरणाऱ्या ली चोंग वुईने टिने बाऊनसह विजयाची नोंद केली. या सामन्याविषयी तो म्हणाला, ‘‘मी फक्त स्थानिक स्पर्धामध्ये दुहेरीचे सामने खेळलो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा माझा पहिलाच दुहेरीचा सामना होता. टिने बाऊनसह मी पहिल्यांदाच खेळलो. भारतात काही दिवसांपूर्वीच दाखल झाल्यानंतर मी सरावात अधिक मेहनत घेत आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा