AFG vs ENG Highlights in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज २६ फेब्रुवारीला इंग्लंड वि. अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. अफगाणिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाचे तीन फलंदाजी अवघ्या ३७ धावांवर बाद झाले. पण संघाचा सलामीवीर इब्राहिम झादरान एका टोकाला पाय घट्ट रोवून उभा होता आणि त्याने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. यासह इब्राहिम झादरानने एक नवा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले आहे. संघाचा सलामीवीर झादरान हा या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला आहे. लाहोरमध्ये झालेल्या या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने लवकर ३ विकेट गमावल्यानंतर, २३ वर्षीय युवा सलामीवीर झादरानने डावाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर वेग वाढवला आणि उत्कृष्ट शतक झळकावले.

इब्राहिमने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी शतकाचे खातेही उघडले. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेला ब गटातील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण दोघांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा विजय आवश्यक होता आणि अशा वेळी अफगाणिस्तानच्या या उत्कृष्ट फलंदाजाने प्रथम आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि नंतर हे शानदार शतक झळकावून आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले.

हेही वाचा
IND vs PAK: “विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची माझी…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?

अफगाणिस्तानने अवघ्या ३७ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी झादरानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या साथीने उत्कृष्ट शतकी भागीदारी केली. यादरम्यान इब्राहिमने आधी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर धावांचा वेग वाढवत अवघ्या १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा तो अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला.

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झादरानने शतक झळकावले होते आणि असे करणारा तो पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला. आपला ३५वा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या झादरानने या डावात १५०० धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो अफगाणिस्तानचा ९वा फलंदाज ठरणार आहे, परंतु सर्वात कमी डावात ही कामगिरी करणारा तो फलंदाज ठरला आहे.

Story img Loader