भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे शमी क्रमवारीत दहाव्या स्थानावर पोहचला आहे. शमीच्या समावेशामुळे सध्या आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या १० गोलंदाजांमध्ये ३ भारतीय गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह पाचव्या तर रविचंद्रन आश्विन सध्या नवव्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम १० गोलंदाज पुढीलप्रमाणे –

१) पॅट कमिन्स – ९०० गुण (ऑस्ट्रेलिया)

२) कगिसो रबाडा – ८३९ गुण (दक्षिण आफ्रिका)

३) जेसन होल्डर – ८३० गुण (वेस्ट इंडिज)

४) निल वेंगर – ८१४ गुण (न्यूझीलंड)

५) जसप्रीत बुमराह – ७९४ गुण (भारत)

६) वर्नेन फिलँडर – ७८३ गुण (दक्षिण आफ्रिका)

७) जेम्स अँडरसन – ७८२ गुण (इंग्लंड)

८) जोश हेजलवुड – ७७६ गुण (ऑस्ट्रेलिया)

९) रविचंद्रन आश्विन – ७७२ गुण (भारत)

१०) मोहम्मद शमी – ७७१ गुण (भारत)

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय जलदगती गोलंदाजांनी भेदक मारा करत मालिका गाजवली. मोहम्मद शमीने या मालिकेत ९ बळी घेतले. तर इशांत आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी १२-१२ बळी घेतले.