श्रीलंकेविरुद्ध आगामी वन-डे सामन्यांची मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. शुक्रवारी आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत विराटने पहिलं स्थान पटकावलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोहलीचा अपवाद वगळता पहिल्या १० जणांच्या यादीत एकाही भारतीय फलंदाजाला आपलं स्थान पक्क करता आलेलं नाहीये. मात्र महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन आणि रोहीत शर्मा यांनी अनुक्रमे १२,१३ आणि १४ वा क्रमांक पटकावलेला आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताच्या भुवनेश्वर कुमारने १३ वं तर अक्षर पटेलने २० वं स्थान मिळवलं आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जाडेजा हा एकमेव खेळाडू १३ व्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या नवीन क्रमवारीनूसार भारत हा वन-डे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला श्रीलंकेविरुद्धची वन-डे मालिका ही कमीत कमी ४-१ अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पहावं लागणार आहे.

आयसीसीच्या नवीन क्रमवारीत भारतीय खेळाडू –

फलंदाज-   १) विराट कोहली – ८७३ पॉईंट, १२) महेंद्रसिंह धोनी – ७२८ पॉईंट, १३) शिखर धवन – ७२५ पॉईंट,  १४) रोहीत शर्मा – ७२४ पॉईंट

गोलंदाज-  १३) भूवनेश्वर कुमार – ६०८ पॉईंट, २०) अक्षर पटेल – ५८५ पॉईंट

अष्टपैलू खेळाडू-
१३) रविंद्र जाडेजा – २४० पॉईंट

अवश्य वाचा – श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर, पालघरच्या शार्दुल ठाकूरचा संघात समावेश