आपल्या अष्टपैलू खेळामुळे नेहमी चर्चेत राहणारा रविंद्र जाडेजा कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी संपल्यानंतर आयसीसीने नुकतीच नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये रविंद्र जाडेजा पहिल्या क्रमांकावर तर भारतीय संघातला त्याचाच साथीदार रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांक मिळाला आहे. अश्विन आणि जाडेजा यांनी श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत दुसऱ्या डावात ३-३ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं होतं. याच कामगिरीचा अश्विन आणि जाडेजाला फायदा झाला असल्याचं सांगितलं जातंय.

याव्यतिरीक्त शिखर धवनला पहिल्या डावात केलेल्या १९० धावांच्या खेळीचाही चांगला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या यादीत शिखर धवन २१ व्या क्रमांकावर पोहचला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर इंग्लंडचा बेन स्टोक्स २५ व्या स्थानावर पोहचला आहे.

आयसीसीसीने नव्याने जाहीर केलेल्या क्रमवारीवर एकदा नजर टाकूयात –

सर्वोत्तम १० फलंदाज –

१. स्टिव्ह स्मिथ ( ९४१ पॉईंट )
२. जो रुट ( ८८५ पॉईंट )
३. केन विल्यमसन ( ८८० पॉईंट )
४. चेतेश्वर पुजारा ( ८६६ पॉईंट )
५. विराट कोहली ( ८२६ पॉईंट )
६. अझर अली ( ७६९ पॉईंट )
७. डेव्हिड वॉर्नर ( ७५९ पॉईंट )
८. क्विंटन डी कॉक ( ७५६ पॉईंट )
९. जॉनी बेअरस्ट्रो ( ७४५ पॉईंट )
१०. हाशिम आमला ( ७४१ पॉईंट )

सर्वोत्तम १० गोलंदाज –

१. रविंद्र जाडेजा – ( ८९७ पॉईंट )
२. रविचंद्रन अश्विन – ( ८४९ पॉईंट )
३. रंगना हेरथ – ( ८४८ पॉईंट )
४. जेम्स अँडरसन – ( ८४८ पॉईंट )
५. जोश हेजलवूड – ( ८२६ पॉईंट )
६. कगिसो रबाडा – ( ७७३ पॉईंट )
७. डेल स्टेन – ( ७७१ पॉईंट )
८. स्टुअर्ट ब्रॉड – ( ७६७ पॉईंट )
९. वर्नन फिलँडर – ( ७५९ पॉईंट )
१०. निल वॅगनर – ( ७४५ पॉईंट )

सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू –

१. शाकीब-अल-हसन – ( ४३१ पॉईंट )
२. रविंद्र जाडेजा – ( ४१४ पॉईंट )
३. रविचंद्रन अश्विन – ( ४१३ पॉईंट )
४. मोईन अली – ( ३७४ पॉईंट )
५. बेन स्टोक्स – ( ३६२ पॉईंट )

Story img Loader