Women’s Cricket FTP Announced for 2025-2029 by ICC: ICC ने २०२५-२०२९ साठी महिला क्रिकेट संघांचा फ्युचर्स टूर प्रोग्राम (FTP) जाहीर केला आहे. ICC महिला चॅम्पियनशिपच्या चौथ्या सीझनसाठी या FTP मध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी संघांची संख्या वाढवण्यात आली आहे. ICC च्या मते, २०२९ च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ११ संघ ICC महिला चॅम्पियनशिपच्या चौथ्या चक्रात भाग घेतील. या स्पर्धेत झिम्बाब्वे पदार्पण करणार आहे, जे महिला क्रिकेटमध्ये अधिक जागतिक प्रतिनिधित्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

महिला चॅम्पियनशिपमध्ये, प्रत्येक संघ सध्याच्या चक्रासह इतर आठ संघांशी स्पर्धा करेल, चार घरच्या मैदानावर आणि चार इतर संघांच्या मायदेशात जाऊन सामने खेळेल. या संपूर्ण स्पर्धेत ४४ मालिका खेळवल्या जातील ज्यामध्ये एकूण १३२ एकदिवसीय सामने खेळले जातील. म्हणजेच प्रत्येक मालिकेत तीन सामने खेळवले जातील. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असताना झिम्बाब्वे संघ बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. याशिवाय झिम्बाब्वे संघ न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे.

Radha Yadav taking amazing catch video viral
Radha Yadav : राधा यादवच्या चित्ताकर्षक कॅचने चाहत्यांच्या डोळ्यांचे फेडले पारणे, VIDEO होतोय व्हायरल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
IPL 2025 Retention Date, Time and Free Live Streaming Details in Marathi
IPL 2025 Retention: IPL 2025 Retention Live मोफत कुठे पाहता येणार? दिवाळीदिवशी होणार रिटेन-रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर
PET, LLM, Pre-Entrance Examinations, Mumbai University,
मुंबई विद्यापीठाकडून ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठी नावनोंदणी सुरू, ‘एलएलएम’, ‘पेट’ची प्रवेशपूर्व परीक्षा ‘या’ तारखांना
IND vs NZ vs New Zealand 2nd Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमावण्याचा धोका, इतिहास बदलणार का?
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
IPL 2025 Mega Auction Big Update on Venue and Dates
IPL 2025 Mega Auction च्या तारीख आणि ठिकाणाबद्दल आली मोठी अपडेट, जाणून घ्या कधी-कुठे पार पडणार लिलाव?
Womens T20 World Cup 2024 Prize Money List
Womens T20 World Cup 2024 : विश्वविजेत्या न्यूझीलंडवर पैशांचा वर्षाव! भारतासह इतर संघांना किती मिळाली रक्कम? जाणून घ्या

हेही वाचा – Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

२०२५ ते २०२९ च्या FTP सायकलमध्ये दरवर्षी एक ICC महिला स्पर्धेचा समावेश असेल, २०२५ मध्ये ICC महिला क्रिकेट विश्वचषकापासून सुरुवात होईल. यानंतर २०२६ मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाईल. सर्वात मोठी अपडेट म्हणजे महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ मध्ये आयोजित केली जाईल. यानंतर २०२८ मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळापासून केले जात आहे. मात्र महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेच्या ठिकाणाबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने भारतीय महिला क्रिकेट संघाला आता २०२७ मध्ये आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी आहे.

आयसीसी स्पर्धेच्या तयारीसाठी, संघांनी परस्पर संमतीने त्रिकोणीय मालिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत. २०२६ मध्ये ICC महिला टी-२० विश्वचषकापूर्वी, इंग्लंड भारत आणि न्यूझीलंड या तीन संघांतील टी-२० मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. तर आयर्लंड पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवणार आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज देखील अनुक्रमे २०२७ आणि २०२८ मध्ये त्रिकोणी मालिका आयोजित करतील.