ICC Women’s T20 World Cup 2024 Prize Money: महिला टी-२० विश्वचषक २०२४ २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ICC ने २०२४ च्या महिला विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी UAE ला दिली आहे. पहिला सामना ३ ऑक्टोबरला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, यादरम्यान ICC ने एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघाला किती बक्षिस रक्कम मिळणार हे जाहीर केले आहे.

ICC ने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मागील विश्वचषकाच्या तुलनेत वाढ केली आहे. ICC ने २०२४ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम ७,९५८,०८० डॉलर्सपर्यंत वाढवली आहे, जी गतवर्षीच्या विश्वचषकाच्या तुलनेत दुप्पट आहे. महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेत्याला तब्बल २.३५ मिलियन डॉलर मिळतील, जे २०२३ मध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला दिलेल्या १ मिलियन डॉलरपेक्षा १३४ टक्क्यांनी अधिक आहेत.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
west Vidarbha, number of women candidates, contesting election
रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात

उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे. उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कमही गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत वाढली आहे, यंदा विजयी होणाऱ्या संघाला १.१७ मिलियन डॉलर रक्कम दिली जाईल. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघाला ६,७५,००० डॉलर इतकी रक्कम मिळेल. तर गट सामने जिंकणाऱ्या संघाला ३१, १५४ डॉलर्स इतकी रक्कम मिळेल

ICC Women’s T20 World Cup 2024: १० संघ होणार सहभागी

यंदा महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये १० संघ सहभागी होत आहेत, प्रत्येकी ५ संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे महिला संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज या महिला संघांचा समावेश आहे.

गट टप्प्यातील शेवटचा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल, तर दोन्ही गटातील टॉप-2 संघ थेट उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित करतील. उपांत्य फेरीचे सामने १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी शारजाहच्या मैदानावर खेळवले जातील, तर स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.