2020 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने आज गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्यांदाच महिला आणि पुरुषांचे विश्वचषकाचे सामने हे एकाच देशात होणार आहे. महिलांच्या सर्वोत्तम 10 तर पुरुषांचे सर्वोत्तम 12 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. महिलांचा टी-20 विश्वचषक 21 फेब्रुवारी 2020 साली सुरु होणार असून, यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय महिलांची पहिला सामना खेळणार आहे.

याचसोबत पुरुषांचा टी-20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियातच 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. भारतीय महिलांचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून भारतीय पुरुष संघाला ब गटात स्थान देण्यात आलं आहे.

टी-20 विश्वचषकासाठी स्पर्धेची गटवारी पुढीलप्रमाणे – (भारतीय महिला)

गट अ – ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, (पात्रता फेरीतील सर्वोत्तम संघ)

गट ब – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज, पाकिस्तान, (पात्रता फेरीतील दुसरा सर्वोत्तम संघ)

भारतीय पुरुषांची गटवारी –

गट अ – पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, विंडीज, (पात्रता फेरीतील अ आणि ब गटातला एक संघ)

गट ब – भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, (पात्रता फेरीतील अ आणि ब गटातला एक संघ)

अवश्य वाचा – IND vs NZ : पांड्याच्या पुनरागमनामुळे भारताचा संघ परिपूर्ण – सुनील गावसकर

Story img Loader