ICC T20I Team of The Year Rohit Sharma Named Captain: सध्या २०२४ वर्षातील आयसीसीचे पुरस्कार जाहीर केले जात आहेत. ज्यामध्ये २०२४ मधील तिन्ही फॉरमॅटमधील महिला आणि पुरूष संघाचे सर्वाेत्कृष्ट संघदेखील जाहीर केले जात आहे. ज्यामध्ये आयसीसी २०२४ मधील सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ जाहीर करण्याच आला आहे. भारताने २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेला टी-२० विश्वचषक २०२४ तब्बल १७ वर्षांनंतर जिंकला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० टीम ऑफ द इयरमध्ये ४ भारतीय खेळाडूंना संधी मिळाली आहे. ज्याचे कर्णधारपद भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माकडे दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ICC T20 टीम ऑफ द इयरमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. यावेळी भारतीय संघातील चार खेळाडूंना टी-२० टीम ऑफ द इयरमध्ये स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंमध्ये रोहित शर्माशिवाय हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. या खेळाडूंनी २०२४ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. हे सर्व खेळाडू टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी अंतिम सामन्यातही अप्रतिम कामगिरी केली.

२०२४ च्या सर्वाेत्कृष्ट टी-२० संघात भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा एक, इंग्लंडचा एक, पाकिस्तानचा एक, वेस्ट इंडिजचा एक, झिम्बाब्वेचा एक, श्रीलंकेचा एक आणि अफगाणिस्तानच्या एका खेळाडूला संधी मिळाली आहे. म्हणजेच भारत हा एकमेव देश आहे, ज्याचे या सर्वाेत्कृष्ट संघात एकापेक्षा जास्त खेळाडू आहेत.

या संघात वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा फिल स्लॉट, पाकिस्तानचा बाबर आझम, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी सर्वाेत्कृष्ट टी-२० संघ २०२४

रोहित शर्मा (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, फिल सॉल्ट, बाबर आझम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, रशीद खान, वानिंदू हसरंगा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.