Women’s T20 World Cup 2024 Schedule: ICC महिला टी-२० विश्वचषक २०२४ यावर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. याआधी ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, मात्र बांगलादेशमधील अराजकता आणि एकूणच राजकीय परिस्थिती पाहता आयसीसीने स्पर्धेचे ठिकाण बदलले. आता ही स्पर्धा दुबई आणि शारजाहच्या स्टेडियममध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेच्या ९व्या हंगामात जगातील सर्वोत्कृष्ट संघ सहभागी होणार असून सर्वांच्या नजरा या रोमांचक स्पर्धेची ट्रॉफी कोण पटकावणार याकडे असतील.
हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?
दोन गटात ४ संघांचे विभाजन
स्पर्धेच्या अ गटात सहा वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, २०२० उपविजेता भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. हे सर्व संघ एकमेकांशी भिडतील आणि दोन सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, २०१६ चे चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. यातील दोन संघ उपांत्य फेरीतही पोहोचतील.
श्रीलंका आणि स्कॉटलंडने या वर्षाच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या क्वालिफायर स्पर्धेद्वारे या विश्वचषकात प्रवेश केला आहे. स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघ चार गट सामने खेळवले जातील. उपांत्य फेरी १७ आणि १८ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबरला दुबईत होणार आहे. सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवसही निश्चित करण्यात आला आहे, जेणेकरून हवामान किंवा इतर कारणांमुळे सामना थांबला असेल तर तो राखीव दिवशी पूर्ण करता येईल.
हेही वाचा – BCCI Secretary: कोण होणार बीसीसीआय सचिव? दिवंगत भाजपा नेत्याच्या मुलाची चर्चा
Womens T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कधी असणार?
यंदाच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर तो उपांत्य फेरी-१ मध्ये खेळेल. बहुप्रतिक्षित असा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ६ ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
Womens T20 World Cup 2024 India Schedule: भारतीय महिला संघाचे वेळापत्रक
४ ऑक्टोबर, शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर, रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
महिला टी-२० विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक
३ ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश वि. स्कॉटलंड, शारजाह
३ ऑक्टोबर, गुरुवार, पाकिस्तान वि. श्रीलंका, शारजाह
३ ऑक्टोबर, शुक्रवार, दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई
४ ऑक्टोबर, शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई
५ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश वि. इंग्लंड, शारजाह
५ ऑक्टोबर, शनिवार, ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, शारजाह
६ ऑक्टोबर, रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई
६ ऑक्टोबर, रविवार, वेस्ट इंडीज वि. स्कॉटलंड, दुबई
७ ऑक्टोबर, सोमवार, इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, शारजाह
८ ऑक्टोबर, मंगळवार, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड, शारजाह
९ ऑक्टोबर, बुधवार, दक्षिण आफ्रिका वि. स्कॉटलंड, दुबई
९ ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१० ऑक्टोबर, गुरुवार, बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह
११ ऑक्टोबर, शुक्रवार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
१२ ऑक्टोबर, शनिवार, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह
१२ ऑक्टोबर, शनिवार, बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
१३ ऑक्टोबर, रविवार, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह
१३ ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
१४ ऑक्टोबर, सोमवार, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
१५ ऑक्टोबर, मंगळवार, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
१७ ऑक्टोबर, गुरुवार, पहिली उपांत्य फेरी, दुबई
१८ ऑक्टोबर, शुक्रवार, दुसरी उपांत्य फेरी, शारजाह
२० ऑक्टोबर, रविवार, अंतिम सामना, दुबई.
© IE Online Media Services (P) Ltd