आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) वार्षिक सभा २४ ते २८ जूनदरम्यान मेलबर्नला होणार आहे. या सभेत भारताचे एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली जाणार आहे. तसेच २०१५ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेविषयीही सविस्तर चर्चा होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीनिवासन यांची शिफारस केली आहे. २८ जून रोजी श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले जाईल, असा अंदाज आहे. या सभेतच आयसीसीच्या घटनेत बदल केले जाणार आहेत. सिंगापूर येथे फेब्रुवारीत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत घटनादुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

Story img Loader