ICC Banned National Cricket League USA: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकेतील राष्ट्रीय क्रिकेट लीगला मोठा धक्का दिला आहे. सचिन तेंडुलकर, वसीम अक्रम आणि सर विवियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचाही या लीगशी संबंध आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयसीसीने अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घातली आहे. आयसीसीने पुढील हंगामाला मान्यता देण्यास नकार दिला आहे, असे म्हटले जात आहे. आयसीसीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात असून त्यांच्या एका चुकीचा मोठा फटका या लीगला बसला आहे.

नॅशनल क्रिकेट लीगने कोणत्या नियमाचे केले उल्लंघन?

अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आयसीसीने कठोर कारवाई करत लीगवर बंदी घातली आहे. नियमांनुसार, या लीगमधील प्रत्येक संघासाठी ७ अमेरिकन खेळाडू आणि ४ परदेशी खेळाडू असणे अनिवार्य आहे. मात्र संघांनी या नियमाचे उल्लंघन केले. हा नियम मोडल्याची माहिती आयसीसीला आधीच मिळाली होती. याशिवाय व्हिसाच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले. आयसीसीनेही उशीर न करता लीगवर बंदी घातली आहे. आयसीसीने पत्र लिहून अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घातली असल्याची माहिती दिली. त्यामुळे नॅशनल क्रिकेट लीगचा पुढील हंगाम आयोजित केला जाणार नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील या लीगचा एक भाग होता. यासंदर्भात माहिती देताना तो स्वत: म्हणाला होता, ‘क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास आहे. आणि अमेरिकेत या खेळासाठी अशा रोमांचक वेळी नॅशनल क्रिकेट लीगमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे. सचिन या लीगमधील मालकी गटाचा भाग आहे.

हेही वाचा – सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज विवियन रिचर्ड्स यांचाही या अमेरिकच्या क्रिकेट लीगशी विशेष संबंध आहे. लीगने या दोन्ही दिग्गजांना एम्बेसेडर केले होते. याशिवाय सुनील गावसकर, सनथ जयसूर्या, व्यंकटेश प्रसाद, झहीर अब्बास, दिलीप वेंगसरकर आणि मोईन खान इत्यादी खेळाडू या लीगशी संबंधित आहेत. हे खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट लीग संघांचे मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक या भूमिकेत असणार होते.

Story img Loader